Last Update:
 
महाराष्ट्र-कर्नाटक

जोतिबाच्या डोंगरावरून एसटी कोसळली; दोन ठार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 10, 2010 AT 02:15 PM (IST)
Tags: st,   accident,   jotiba,   kolhapur
कोल्हापूर - सांगलीहून श्री क्षेत्र जोतिबाकडे निघालेली राज्य परिवहनमहामंडळाची बस दरीत कोसळून दोन भाविक मृत पावल्याची आणि १५ जण जखमीझाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. याघटनेनंतर तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
 
जखमींनाकोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारणअद्याप स्पष्ट झालेले नाही. सांगलीहून आलेली एसटी बस कोल्हापूरमार्गेजोतिबाच्या डोंगराकडे निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाला. गाडीमध्येनेमके किती प्रवासी होते, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: