माओवाद्यांच्या बंदचा बाजारपेठ, वाहतुकीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 07, 2010 AT 02:54 PM (IST)
गडचिरोली - नक्षल नेता आझाद यांच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज (ता.सात व आठ) ला पुकारलेल्या बंदमुळे नक्षलग्रस्त भागात अनेक ठिकाणी बाजारपेठ व वाहतूक बंद होती. आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील गोलागर्जी गावाजवळ माओवाद्यांनी रस्त्यात झाडे तोडून टाकल्याने या मार्गाची वाहतूक आज सकाळ पासूनच बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून एस.टी. महामंडळाने दुर्गम भागातील अनेक मार्गाच्या बस फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. बंद हाणून पाडण्यासाठी पोलिस प्रशासनानेही जिल्हात चोख बंदोबस्त लावला आहे.माओवाद्यांच्या बंदचा शाळा महाविद्यालय व शासकीय कामकाजावर मोठा परिणाम दिसून आला.