Last Update:
 
साप्ताहिक भविष्य (चंद्र रास)

मेष
सुवर्णस्पर्शी दिवस गुरू-मंगळ शुभयोगातून ता. 16 नोव्हेंबर ते ता. 17 नोव्हेंबर 11 हे दिवस मोठे भाग्यप्रेरित. गुरुपुष्यामृत कार्तिक महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर एक सुवर्णस्पर्शी दिवस अश्‍विनी नक्षत्र झळाळून निघेल. अर्थात वरील दिवस वैयक्तिक मोठ्या सुवार्ता व उत्सव-समारंभांच्या धामधुमीचे. खरेदी कराच. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी घ्याच. भरणी नक्षत्रास कायदेशीर कामांतून यश.
वृषभ
संमिश्र फळे देणारा सप्ताह आपल्या राशीस एकूणच संमिश्र स्वरूपाची फळे देणारा सप्ताह. सप्ताहात रोहिणी नक्षत्र एका आनंदकोशात राहील. प्रिय व्यक्तीवरील संकट जाईल. दैवी प्रचिती येईल. ता. 17 च्या गुरुपुष्यामृतावर सोने खरेदी करण्यापेक्षा गुरुस्मरण किंवा गुरुदर्शन घ्या. नवसंवत्सरातील एक अप्रतिम दिवस. बाकी कृत्तिका नक्षत्रास ता. 19 चा शनिवार सूर्योदयी प्रतिकूल. दुष्ट संपर्क.
मिथुन
लॉटरी लागेल व सरकारी कामे होतील "Jupiter Effect` राहील. तरुणांना सप्ताह खासच. ता. 16 व ता. 17 नोव्हेंबर 11 हे दिवस भाग्यबीजे पेरणारे. व्यावसायिक लॉटरी लागेल. सरकारी कामे होतील. मृग नक्षत्र व्यक्ती आणि आर्द्रा नक्षत्र प्रथम चरण व्यक्ती सप्ताहात गुरुभ्रमणाच्या प्रभावाचा जबरदस्त लाभ घेतील. मात्र. ता. 19 ची सकाळ एकूणच आपल्या राशीस उपद्रवमूल्य असलेली.
कर्क
नोकरीत वर्चस्व वाढेल सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये अधिकार गाजवणारी रास राहील. मोठे ग्रह अर्थात शनीचे झालेले राश्‍यांतर परिणाम साधणारे. सप्ताहात मंगळ-गुरूचा शुभयोग ता. 16 व ता. 17 नोव्हेंबर 11 हे दिवस सुवर्णस्पर्शी करणारे. नोकरीतील वर्चस्व वाढेल. पुष्य नक्षत्रास मोठे घटनात्मक अधिकार मिळतील. आश्‍लेषा नक्षत्रास पुत्रोत्कर्ष प्रसन्न करेल. मात्र. ता. 19 ची सकाळ दगाफटक्‍याची.
सिंह
साडेसाती संपली साडेसाती ढोबळमानाने संपलेली आहे. मात्र या कालभैरव जयंतीच्या सप्ताहात कोणताही जल्लोष नको. सप्ताहात अंतर्यामी आनंद उपभोग. ता. 16 व ता. 17 नोव्हेंबर 11 हे दिवस चिंतामुक्ती करणारे. संतसमागमातून साक्षात्कार होतील. मघा नक्षत्रव्यक्तींची पुत्रचिंता जाईल. नोकरीतील अरिष्ट जाईल. बाकी ता. 19 ची सकाळ अतिशय काटेरी. काहींना वेदनायुक्त राहील.
कन्या
तरुणांना उत्तम काळ शनीच्या राश्‍यांतरातून लगेच फरक पडत नसतो. तो Joinning Period जादा घेतो. त्यामुळे उन्माद नको. बाराव्या मंगळाला फावणार आहे. असो. सप्ताह बुध-शुक्र सहयोगाचाच राहील. हस्त नक्षत्राच्या तरुणांना ता. 16 व ता. 17 हे दिवस वैयक्तिक संदर्भातून विशेष शुभ. मित्रांकडून लाभ. सौंदर्यवतीचा सहवास घडेल. उत्तरा नक्षत्रास ता. 19 चा शनिवार एकूणच खराब.
तूळ
गुरुभक्तीच्या भावोन्मेषात राहाल साडेसातीची घटनासमिती क्रियाशील होणार आहे. सप्ताहात "Jupiter Effect` राहीलच. त्याचा लाभ अवश्‍य घ्या. ता. 17 च्या कार्तिकातील गुरुपुष्यामृताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वाती नक्षत्राचे पूर्वसुकृत फळास येईल. गुरुभक्तीच्या भावोन्मेषात राहाल. सप्ताहात विशाखा नक्षत्रास मोठे सांपत्तिक लाभ. स्त्रीकडून सन्मान.
वृश्चिक
दगाफटक्‍याची शक्‍यता विशिष्ट कुयोगातून मानसिक व्हायरस निर्माण होऊन माणसांची डोकी फिरतात आणि माणसांच्या कृती बिघडतात आणि काळभैरव डाव साधतात. काळभैरवांशी आपल्या राशीचा फार जवळचा संबंध आहे. असो. सप्ताहात उन्माद नको. बाकी ता. 16 व ता. 17 नोव्हेंबर 11 हे दिवस एकूणच आपल्या राशीस शुभ. ता. 19 चा शनिवार अनुराधास उत्सव-समारंभातून दगाफटक्‍याचा.
धनु
नवपरिणितांचे घराचे स्वप्न साकार सप्ताहातील कार्तिकातील गुरुपुष्यामृत आपल्या राशीस मानसिक पातळीवरून उत्तम राहील. मूळ नक्षत्रास विशिष्ट संकटनिवारणातून दिलासा देणारा सप्ताह. तरुणांना सप्ताहाची सुरवात वैयक्तिक मोठ्या कौतुकसमारंभाची. पूर्वाषाढा नक्षत्रास एकूणच सप्ताह भाग्यप्रेरक. नवपरिणितांचे घराचे स्वप्न साकारेल. एखादा शत्रू जीवनातून निघून जाईल. शनिवारी भातृचिंता.
मकर
रेंगाळलेली कामे होतील सप्ताह व्यावहारिक पातळीवरून उत्तमच. उत्तराषाढा नक्षत्रास अभूतपूर्व असे लाभ होतील. म्हणाल ती कामे होतील. घरातील विशिष्ट रेंगाळलेली कामे होतील. श्रवण नक्षत्रास राजकारणी व्यक्तीकडून लाभ होतील. नोकरीतील राजकारण यशस्वी होईल. काहींना अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. उदा. कोणाच्या रजेवर जाण्याचा फायदा होईल. शनिवारी मोठी वाहनपीडा.
कुंभ
प्रेमप्रकरणातून मनस्ताप सप्ताहाची सुरवात विलक्षण सुंदर राहील. "Jupiter Effect` काय असतो ते समजेल. धनिष्ठा नक्षत्रास मोठे धनलाभ. मात्र प्रेमप्रकरणांतून मनस्ताप व गुप्तचिंता. ता. 18 व ता. 19 हे दिवस अतिशय प्रदूषित राहतील. बाकी शततारका नक्षत्राचे अतिशय उत्तम चाललेय. विशिष्ट वैयक्तिक भाग्योदयातून चर्चेत राहाल. सामाजिक कार्यातून यश.
मीन
व्यावसायिक कामात यश सप्ताहात रेवती नक्षत्राचे "खुल जा सिम सिम' होणार आहे. विशिष्ट आडाखे खरे ठरतील. व्यावसायिक धनवर्षाव होईल. घरातील तरुणांचे प्रश्‍न सुटतील. वास्तूविषयक विशिष्ट व्यवहार क्‍लिक होतील. विद्यार्थ्यांना व तरुणांना ता. 16 व ता. 17 हे दिवस भाग्य घेऊन येणारे. विवाह, नोकरी वा शिक्षण इत्यादी माध्यमातून जीवन मार्गी लागेल. ता. 19 चा दिवस यंत्रविरोधी.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: