Last Update:
 
माझे शहर

म्हापसा, ता. 28 : म्हापसा पोलिस स्टेशन हे उत्तर गोव्यातील एक मोठे पोलिस स्थानक. या पोलिस स्थानकाची कार्यकक्षाही मोठी आहे. दरवर्षी पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे. पोलिस स्थानकाच्या कामातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन या पोलिस स्थानकाचा दर्जा, सुविधा, साधनसामग्री, अधिकारी व पोलिसांची संख्या वाढायला हवी अन्यथा येणाऱ्या काळात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Thursday, December 29, 2011 AT 01:00 AM (IST)

वाळपई, ता. 14 ः पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. पण वाळपई नगरपालिका शहर तसेच सत्तरीतील अन्य पंचायतीत पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे, ते वाळपई शहराला लागूनच असलेल्या दाबोस पाणी प्रकल्पातून. शहरासाठी हा प्रकल्प अमृतकलशच बनला आहे. शहरातील संपूर्ण प्रभागातील नागरिक या प्रकल्पावरच आजपर्यंत अवलंबून राहिले असून, या पाणी प्रकल्पाचा फायदा भविष्यातही लोकांना होणार आहे.

Thursday, December 15, 2011 AT 01:00 AM (IST)

वास्को, ता. 12 ः चिखली कुटीर रुग्णालयाचा विस्तार करणे, त्याचा दर्जा सुधारणे या गोष्टींना मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांनी आपल्या जाहीरनाम्यात खास स्थान दिले होते. परंतु गेल्या साडेचार वर्षात या रुग्णालयाचा दर्जा वाढला नाही, तसेच त्याठिकाणी नवीन इमारतही उभी राहिली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात चिखली कुटीर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला पुन्हा स्थान मिळणार यात शंकाच नाही.

Tuesday, December 13, 2011 AT 01:00 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: