अर्थविश्‍व
दर्जाबाबत गोवा डेअरीकडून तडजोड नाही!
    <description>गोवा सहकारी दूध उत्पादक संघाचे दूध किंचित महाग असले तरी दुधाच्या दर्जाबाबत कधी तडजोड केली नाही. दर्जाबाबत गोवा दूध उत्पादक संघ आघाडीवर आहे. परराज्यातील दूध संस्थांकडून गोव्यात वितरण होणाऱ्या दुधाशी तुलना करता गोवा डेअरीच्या दुधात कधीच आरोग्याला हानिकारक द्रव्ये आढळून आली नाहीत. त्यामुळे गोमंतकीयांत गोवा डेअरीच्या उत्पादनाबद्दल विश्‍वास आहे, असे प्रतिपादन गोवा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी आज केले. ढवळी येथील मातृछायेत आयोजित जागतिक दुग्ध दिन कार्यक्रमानिमित्त श्री. सहकारी बोलत होते. ते पुढे म्हणाले, गोमंतकीयांच्या याच विश्‍वासाच्या आधारावर व सहकार्यामुळे गोवा डेअरी वार्षिक सुमारे पाच लाख रुपये सामाजिक कार्यासाठी खर्च करते. असे कार्य गोव्यात दूध वितरणाद्वारे नफा कमवत असलेल्या इतर व्यावसायिक दूध संस्थांकडून अपेक्षित आहे. भविष्यातही गोवा दूध उत्पादक संघाला गोव्याच्या जनतेकडून सहकार्याचा हात हवा. जागतिक पातळीवर २००१ पासून दुग्ध दिन साजरा करण्यात येत असून, यंदा प्रथमच गोव्यात गोवा डेअरीतर्फे ढवळी येथील "मातृछाये'मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.</description>