देश-विदेश
राम मंदिराचा मुद्दा घेऊन अडवानी उतरले प्रचारात
    <description>अयोध्या, ता. 5- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी राम मंदिराचा मुद्दा घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराच्या मुद्याला हवा दिली आहे. याच मुद्यावर यंदाही मते मिळतील, असा अडवानींना विश्‍वास वाटतो आहे. "माझे उद्दिष्टे तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अयोध्येत राम मंदिर उभे राहील,' असे विधान अडवानी यांनी येथे जाहीर सभेत केले आहे. रामाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी मंदिर उभे राहावे, याची लाखो रामभक्तांनाही प्रतीक्षा आहे. न्यायालयानेही रामाची मूर्ती जेथे आहे, तेच रामाचे जन्मठिकाण असल्याचे स्वीकारले आहे, असाही उल्लेख त्यांनी केला. भारतीयांच्या परदेशी बॅंकांतील काळ्या पैशाच्या मुद्यावरून त्यांनी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.</description>
रेल्वे तिकीट म्हणून "एसएमएस'ही चालेल
    <description>नवी दिल्ली, ता. 5 - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्‍ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. "आयआरसीटीसी'कडून आलेला "एसएमएस' हेच नवे तिकीट असेल. या "एसएमएस'मध्ये बदल केला जात आहे.  "ई-तिकीट'ची छापील प्रत नसल्यास मोबाईल, लॅपटॉप किंवा पामटॉपवर आरक्षित केलेले तिकीट छायाचित्र असलेल्या ओळखपत्रासमवेत वैध मानण्याचे रेल्वेने यापूर्वीच ठरविले होते. आता "आयआरसीटीसी'तर्फे पाठविला जाणारा "एसएमएस'देखील ई-तिकीट म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानुसार प्रवाशाने इंटरनेटवरून तिकीट आरक्षित केल्यानंतर "आयआरसीटीसी'च्या "एसएमएस'मध्ये पीएनआर, रेल्वे क्रमांक, प्रवासाची तारीख, श्रेणी, प्रवाशाचे नाव, कोच व आसन क्रमांक, भाडे असा तिकिटाचा संपूर्ण तपशील असेल. शक्‍य झाल्यास त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावेही "एसएमएस'मध्ये टाकण्याचा प्रयत्न असेल.</description>
यूपी इलेक्‍शनवर सट्टेबाजारात मंदी!
    <description>लखनौ, ता. 5 ः उत्तर प्रदेशातील निवडणूक साऱ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असल्याने एरवी क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांनीही जोरदार तयारी केली आहे  पण निकाल काय लागणार? याबाबत तेही संभ्रमातच आहेत. त्यामुळे अद्याप सट्टेबाजारात तेजी दिसून येत नाही. या वेळी निकालांवर दहा कोटींचा सट्टा लागण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. निकालाचा अंदाज येत नसल्याने सट्टेबाजारात फार तेजी असणार नाही, अशी माहिती एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. समाजवादी पक्षाला 137 ते 141 जागा मिळतील, असाही एक मतप्रवाह सट्टेबाजारात आहे. पाठोपाठ बहुजन समाज पक्ष 118 ते 122 आणि कॉंग्रेस तिसऱ्या स्थानी राहून त्यांना 66 ते 69 जागा मिळतील, असा अंदाज बांधला जात आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जवळ आल्यावर या आकड्यांमध्ये बदल होण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या क्रिकेट विश्‍वकरंडकात देशभरात तब्बल 30 कोटींचा सट्टा लागला होता. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीतील सट्ट्याची रक्कम निश्‍चितच कमी असणार आहे.</description>
"तिरुमलाच्या कामात  त्रिदंडींचा हस्तक्षेप नको'
    <description>हैदराबाद, ता. 5 : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (टीटीडी) अंतर्गत कारभारात श्री त्रिदंडी चिनाजिअर स्वामी यांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट मत राज्याचे देणगीमंत्री सी. रामचंद्रय्या यांनी आज व्यक्त केले.  "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना रामचंद्रय्या यांनी सांगितले, की भाविकांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागतच केले जाईल. प्रत्येक भाविकाने आपल्या सूचना मांडाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, या आडून कोणीही देवस्थानावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू नये.  श्री त्रिदंडी स्वामी यांनी तिरुमला मंदिर परिसरात नुकताच महायज्ञ केला. त्या वेळी त्यांनी "टीटीडी'चे अध्यक्ष के. बपी राजू यांच्या उपस्थितीत स्थानिक प्रशासनावर रुबाब गाजविण्याचा प्रयत्न केला. तसेच पूजेच्या प्रथा मोडून काढण्याचे वक्तव्य केले. याशिवाय राज्यातील जनतेवरील शाप दूर करण्यासाठी 14 व्या शतकातील हजार खांब मंदिर (वेय्या काल्ला मंडपम) पाडून टाकावे. तिरुमलाच्या सुधारणेसाठी देवस्थानाच्या प्रशासनात स्वच्छता करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले होते.</description>
सरसंघचालकांची अण्णा हजारेंवर टीका
    <description>पाटणा, ता. ५- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या वर्षी पुकारलेल्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याची हजारे कबुली का देत नाहीत? असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) केला.   यासंदर्भात भागवत म्हणाले,""भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात संघाचे कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर सक्रिय सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यात संघाच्या कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ होते. मात्र अण्णा हजारे याची कबुली का देत नाहीत? ही बाब मला अस्वस्थ करीत आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला असला तरी संघाने त्यांना तसे करण्यास सांगितले नव्हते. तो त्यांच्या वैयक्तिक निर्णय होता. भ्रष्टाचारासंदर्भात हजारे आणि संघाचे विचार एक असले तरी सिव्हिल सोसायटीच्या आंदोलनांमध्ये संघाचा समावेश नव्हता.''   ""वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली तरी राजकीय व्यवस्थेत बळावलेला भ्रष्टाचार मिटणार नाही.</description>
अमरसिंहांमुळे मी कॉंग्रेसमध्ये -संजय दत्त
    <description>अलाहाबाद, ता. ५ - समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार अमरसिंह यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी कॉंग्रेस पक्षात आहे, असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आज (रविवार) व्यक्त केले.  कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी अलाहाबादला आलेला संजय दत्त म्हणाला,""मी कॉंग्रेसमध्ये पुनरागमन करावे असा सल्ला अमरसिंह यांनी मला दिला होता. त्यांच्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये आहे. फार पूर्वीपासून माझ्या कुटुंबाचा कॉंग्रेसशी संबंध आहे. त्यामुळे माझ्या धमण्यांमध्ये जणूकाही कॉंग्रेसचे रक्त आहे, असे मला त्यांनी सांगितले होते.''   समाजवादी पक्षाने अमरसिंह यांना निलंबित केल्याने दुःखी झालेला संजय दत्त म्हणाला,""समाजवादी पक्षाने अमरसिंह यांच्यावर अन्याय केला आहे. त्याचे मला खूप दुःख झाले. समाजवादी पक्षाच्या उभारणीत अमरसिंह यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांना पक्षाने बाहेरचे दार दाखविले आहे. त्यामुळे मीही समाजवादी पक्षातून बाहेर पडलो. त्यानंतर त्यांनी मला कॉंग्रेसमध्ये परतण्याचा सल्ला दिला.''</description>
युवराज सिंगला कॅन्सर; अमेरिकेत उपचार
    <description>नवी दिल्ली, ता. ५ - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे. &nbsp  एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही. युवराज यामुळे अनेक काळ क्रिकेटपासून दूर राहणार असून, तो मे महिन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. युवराज २६ जानेवारीला अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाला होता. ऑक्टोबरच्या अखेरीस युवराजला कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले होते. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना माहिती झाल्याने उपचार करणे शक्य झाले आहे. तो लवकरच ठीक होईल.   त्यापूर्वी एका वृत्तपत्राने युवराजच्या फुफ्फुस आणि हृदयाच्यामध्ये ट्युमर असल्याचे वृत्त दिले होते. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच युवराज सिंगला त्रास होण्यासा सुरुवात झाली होती. अनेकवेळा त्याला खोकल्याचा त्रास होत होता.</description>
फेसबुकला आठ वर्षे पूर्ण!
    <description>वॉशिंग्टन, ता. ५ - सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाली. फेसबुकचे सध्या ८० कोटी ४५ लाख युजर्स जगभरात आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात १०० कोटींचा आकडा पार करण्याची कंपनीची योजना आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ४ फेबुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात केली होती. झुकेरबर्ग यांच्यासह एड्युर्डो सेवरीन, डस्टीन मोस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युज या तिघांचा समावेश होता.   सुरुवातीला फेसबुक हे फक्त हार्वर्ड विद्यापीठापुरते मर्यादीत होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या पाठींब्यामुळे फेसबुकचे जाळे इतर महाविद्यालये आणि विद्यापिठात पसरत गेले. अखेर ४ फेब्रुवारी २००८ मध्ये फेसबुक हे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना खुले करण्यापूर्वी 'दफेसबुकडॉटकॉम' असे याचे डोमेन नाव होते. मात्र, नंतर ते बदलून फेसबुक असे करण्यात आले. सध्या फेसबुकने शेअऱ बाजारात कंपनीची नोंद केली आहे. तसेच झुकेरबर्ग हा जगातील पाचवा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.</description>
अण्णा हजारे अशिक्षित - ओम पुरी
    <description>पतियाळा, ता. ५ - काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी असलेले अभिनेते ओम पुरी यांनी अण्णा हजारे यांना अशिक्षित आणि दिशाहीन असल्याचे म्हटले आहे.   ओम पुरी यांनी अण्णांच्या मोहिमेला योग्य म्हटले असले तरी, अण्णांना चार जणांकडून खेळविले जात असल्याचे सांगितले. येथील राजपुरामध्ये कार्यक्रमात बोलताना ओम पुरी म्हणाले, ''अण्णा हजारे प्रामाणिक असून, एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांचे शिक्षण कमी झाले आहे. फक्त प्रामाणिक असून उपयोग नाही, त्यासाठी काही तरी व्हिजन समोर असले पाहिजे. अण्णांनी संसदेचा सन्मान केला पाहिजे. अण्णांच्या आजूबाजूला असलेल्या मोजक्या चार व्यक्तींबरोबरच त्यांनी इतरही काही शिक्षीत लोकांना भेटले पाहिजे.''  रामलिला मैदानात अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना ओम पुरी यांनी त्यांचे समर्थन करीत मंत्र्यांना भ्रष्ट आणि अशिक्षित असे संबोधले होते. त्यावेळी अनेक खासदारांनी नाराजी दर्शवित त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार नोटीस पाठविली होती.</description>
२ जी स्पेक्ट्रमच्या 'रेंज'मध्ये चिदंबरम नाही !
    <description>(पीटीआय) &nbsp                                                                      नवी दिल्ली - "केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात सहआरोपी करून घ्यावे,' अशी मागणी करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गृहमंत्र्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.   तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या काळात वाटप करण्यात आलेले 122 स्पेक्‍ट्रम परवाने रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता. त्यानंतर आज (शनिवार) होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची याचिका फेटाळल्याने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.    न्यायालयात स्वामींशी ४५ मिनिटे चर्चा  या प्रकरणी निकाल सुनाविण्यापूर्वी न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशी न्यायालयाच्या खोलीत ४५ मिनिटे चर्चा केली. निकाल सुनाविण्यापूर्वी वकील आणि पत्रकारांना खोलीच्या बाहेर काढण्यात आले होते.</description>