क्रीडा
भारतीय वाघांची कांगारूंसमोर सपशेल शरणागती
    <description>मेलबर्न, ता.५ - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आज (रविवार) भारतीय कागदी वाघांचा ऑस्ट्रेलियन कांगारूंनी तब्बल 65 धावांनी दणदणीत पराभव केला.  ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सरस कामगिरी करीत भारतासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करीत भारतीय फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट दिल्याने भारताला सर्वबाद 151 धावा करता आल्या. गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना या भारतीय फलंदाजांना तर धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सचिन तेंडुलकर केवळ दोन धावांवर तर गंभीर पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाजीला जणू गळती लागली. एकही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.   दरम्यान, सामन्याच्या सुरवातीला भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवीत भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार आणि विनय कुमार यांनी सुरवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.</description>
ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर २१७ धावांचे आव्हान
    <description>मेलबर्न, ता. ५ -&nbsp  मॅथ्यू वेडचे आणि डेव्हिड हसीच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयसाठी २१७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून विनय कुमारने तीन बळी मिळविले. तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या सलामीच्या या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवीत भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार आणि विनय कुमार यांनी सुरवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. विनय कुमारची गोलंदाजी खेळण्यास डेव्हिड वॉर्नरला सुरुवातीपासूनच अडचण येत होती आणि अखेर त्याला ६ धावांवर वॉर्नरला त्रिफळाबाद करीत विनय कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर एकदिवसीय सामन्यात खेळत असलेल्या रिकी पाँटिंगलाही रैनाकडे झेल देण्यास भाग पाडून विनय कुमारने दुसरे यश मिळविले. पाँटिंग २ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या जोरदार पावसामुळे बराच वेळ खेळ थांबविण्यात आला. यामुळे सामना प्रत्येकी ३२ षटकांचा करण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला.</description>
युवराज सिंगला कॅन्सर; अमेरिकेत उपचार
    <description>नवी दिल्ली, ता. ५ - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे. &nbsp  एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही. युवराज यामुळे अनेक काळ क्रिकेटपासून दूर राहणार असून, तो मे महिन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. युवराज २६ जानेवारीला अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाला होता. ऑक्टोबरच्या अखेरीस युवराजला कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले होते. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना माहिती झाल्याने उपचार करणे शक्य झाले आहे. तो लवकरच ठीक होईल.   त्यापूर्वी एका वृत्तपत्राने युवराजच्या फुफ्फुस आणि हृदयाच्यामध्ये ट्युमर असल्याचे वृत्त दिले होते. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच युवराज सिंगला त्रास होण्यासा सुरुवात झाली होती. अनेकवेळा त्याला खोकल्याचा त्रास होत होता.</description>
सुमारे १० कोटींना झाली रवींद्र जडेजाची विक्री!
    <description>बंगळुरू, ता. ४ - आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी आज (शनिवार) येथे लिलावास सुरुवात झाली आहे. या लिलावात देश-विदेशातील १४४ क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आतापर्यंत झालेल्या लिलावात सर्वाधिक म्हणजे सुमारे १० कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे.  चौथ्या मोसमात आयपीएलमध्ये सहभागी झालेले कोटी टस्कर्सचे निलंबन आणि पुणे वॉरियर्स इंडियाचे मालक सहारा इंडियाने मालकी रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॉयल गार्डेनिया हॉटेलमध्ये होत असलेल्या या लिलावात पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत. ब्रँडन मॅक्युलम याला कोलकता नाईट रायडर्सने ९ लाख अमेरिकन डॉलरला विकत घेतले.   जेम्स अँडरसन, तमिम इक्बाल, ऍड्रियन बराथ, रामनरेश सरवान.</description>
सहाराने काढला भारतीय संघाचा 'सहारा'
    <description>नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या 'सहारा' इंडिया कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.  आज (शनिवार) आयपीएलच्या पाचव्य मोसमासाठी होत असलेल्या लिलावापूर्वी सहाराने हा निर्णय घेत सर्वांनाच मोठा झटका दिला. पुणे वॉरियर्सचा कर्णधार युवराज सिंह याच्यावरून बीसीसीआय आणि सहारामध्ये वाद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सहारा इंडियाने बीसीसीआयकडे युवराजच्या जागी इतर खेळाडूची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र, बीसीसीआयकडून सहाराची ही मागणी धुडकावून लावण्यात आली. युवराजवर सध्या उपचार सुरु असून, बीसीसीआयकडून त्याच्याबाबत सहानभूती दर्शविणे आवश्यक असल्याचे सहाराने म्हटले होते.   सहाराने प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय घेत बीसीसीआयला आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी विकत घेणाऱ्या इच्छूकाला विक्री करावी, असेही सांगतिले आहे.</description>
भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान
    <description>सिडनी, 1 - मॅथ्यू वेड याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे.   सिडनीतील ऑलिंपिक पार्क मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवार डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांनी चांगली सुरुवात करून देत जोरदार फटकेबाजी केली. वॉर्नर २५ धावांवर बाद करीत विनय कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. वेडने बर्टच्या साथीत संघाच्या धावसंख्येत वाढ केली. अश्विनने बर्टला रैनाकरवी १७ धावांवर बाद केले. वेड आणि डेव्हिड हसी यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करीत संघाचे शतक पूर्ण केले. वेडने ट्वेंटी-२० कारकिर्दीतील आपले पहिले अर्धशतक झळकावित ४३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्याला रैनाने त्रिफळाबाद केले. शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड हसी फटकेबाजी करीत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करून दिली.   भारतीय संघात दोन फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. आर.</description>
पाकिस्तान इंग्लंडला व्हाईटवॉश देईल- आफ्रिदी
    <description>कराची, 1 - जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाला पाकिस्तान पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून व्हाईटवॉश देईल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे.  आफ्रिदी म्हणाला, ''मला वाटतेय की, पाकिस्तान तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा सहज पराभव करेल. पाकिस्तानला ही मालिका ३-० अशी जिंकण्याची चांगली संधी आहे. सध्याच्या संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करीत असून, त्यांना यश मिळत आहे. प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी ओळखून संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावित आहेत. सध्या संघाचा आत्मविश्वास खूप उंचावलेला आहे.''  तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आफ्रिदी एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० सामन्यांसाठी पाकिस्तान संघात सहभागी होणार आहे.</description>
स्पोर्टिंग क्‍लबचाने पिछाडीवरून विजय
    <description>पणजी, ता. 1&nbsp  ः सामन्याच्या पहिल्या वीस मिनिटांत दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या स्पोर्टिंग क्‍लब द गोवा संघाने नंतर झुंजार खेळ केला व पाचव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुणे एफसी संघाला 4-2 असे पराजित केले. फातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर अठराव्या फेरीतील सामना बुधवारी झाला.   सामना गमावल्यामुळे मागील अकरा सामन्यांत अपराजित असलेल्या पुणे एफसी संघाला प्रथमच गुण गमवावे लागले. त्यांचा हा स्पर्धेतील चौथाच पराभव ठरला, त्यामुळे त्यांचे 28 गुण व सातवे स्थान कायम राहिले. स्पोर्टिंग क्‍लबने गुणतक्‍त्यात प्रगती साधताना 27 गुणांसह आठवा क्रमांक मिळविला आहे. तीन प्रमुख खेळाडू नसतानाही झुंजार खेळ केलेल्या स्पोर्टिंग क्‍लब लागोपाठ सहाव्या सामन्यात अपराजित राहिला. त्यांचा हा एकंदरीत सातवा विजय ठरला.   कीता मॅंडोयू याने अनुक्रमे 8 व 20व्या मिनिटाला गोल केल्यामुळे पुणे एफसी संघाला अपेक्षित सुरवात मिळाली होती, मात्र नंतर फासे स्पोर्टिंगच्या बाजूने पडू लागले. तिसाव्या मिनिटाला ओग्बा कालू याने पेनल्टी फटक्‍यावर पिछाडी कमी केल्यानंतर या नायजेरियन खेळाडूने 45व्या मिनिटाला स्पोर्टिंग क्‍लबला बरोबरी साधून दिली.</description>
डाऊचे प्रायोजकत्व कायम राहणार
    <description>लंडन, 27 - 1984 साली घडलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेवरून डाऊ केमिकल्स या कंपनीच्या ऑलिंपिक 2012 च्या प्रायोजकत्वाला असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असला तरी कंपनीचे प्रायोजकत्व मागे घेतले जाणार नाही, असे आयोजकांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले.  &nbsp     यासंदर्भात लंडन ऑलिंपिकचे कार्यकारी अधिकारी म्हणाले,""आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने डाऊ केमिकल्ससोबत 10 कोटी पाऊंडचा करार केला आहे. कुणी राजीनामा दिला म्हणून करारावर फेरविचार करण्याची गरज नाही. भोपाळ पीडितांसंदर्भात असलेली मते जाहीर करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांच्या मताचा आम्ही आदर करतो. आतापर्यंत 12 जणांनी डाऊच्या प्रायोजकत्वावरून राजीनामे दिले आहेत. मात्र आम्ही माघार घेणार नाही.''&nbsp   डाऊ केमिकल्सच्या ऑलिंपिक 2012 च्या प्रायोजकत्वाला असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणप्रेमी मिरिडेक्‍ट अलेक्‍झांडर यांनी ऑलिंपिकच्या इथिक कमिटीचा राजीनामा दिल्यावर ब्रिटनमधील अनेक राजकारणी डाऊविरोधातील आंदोलनात सहभागी होत आहेत.</description>
हजारिका, मिरांडा, डॉ. संचेतींना पद्मविभूषण
    <description>नवी दिल्ली ता. 25 - दिवंगत ज्येष्ठ गायक-संगीतकार भूपेन हजारिका, दिवंगत व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण, प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, धर्मेंद्र, शबाना आझमी, प्रा. शशिकुमार चित्रे, मीरा नायर यांच्यासह 27 जणांना पद्मभूषण, तर लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, नाटककार सतीश आळेकर, उद्योजक अरुण फिरोदिया, प्रभाकर वैद्य आदींसह 77 जणांना या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार बुधवारी जाहीर झाले.    प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. यंदाच्या "पद्म' पुरस्कारांवर महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व असून, 109 जणांच्या यादीत तब्बल 23 महाराष्ट्रीयांनी हा मान मिळवला आहे.   या पुरस्कारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील सर्वोच्च असलेल्या "भारतरत्न'साठी दोन क्रीडापटूंच्या नावांची शिफारस या वर्षी प्रथमच करण्यात आली आहे. हॉकीचे जादूगार दिवंगत मेजर ध्यानचंद आणि पहिला एव्हरेस्टवीर दिवंगत तेनसिंग नोर्गे यांची नावे "भारतरत्न'साठी सुचवण्यात आली आहेत.</description>