नवा चित्रपट
मामाच्या "थीम'ला भाच्याचे "एक्‍स्टेन्शन'!
    <description>युवराज यादव एखाद्या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण व्हावं, किंबहुना माध्यमांच्या माऱ्यातून ते जबरदस्तीनं निर्माण केलं जावं आणि प्रत्यक्ष चित्रपट आल्यानंतर त्यात तसं काहीच वेगळं नाहीय, हे लक्षात यावं  सगळ्याच अपेक्षा फोल ठराव्यात... असं आजकाल अनेकदा घडत आहे. "आय हेट लव्हस्टोरीज'मध्ये ते पुन्हा घडलं आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचीच प्रचंड "जनजागृती' केली होती. त्यामुळं हा चित्रपट नेहमीच्या रूटीनपलीकडचा असेल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात मात्र, चित्रपट या अपेक्षांना उतरू शकला नाही आणि आमीर खानची थोडीअधिक कॉपी करून या चित्रपटात त्याचा भाचा इम्रान खान यानं एकतऱ्हेनं प्रेक्षकांना "मामा'च केलं आहे, असं वाटलं. अर्थात याचा दोष प्रत्यक्षपणे त्यांना काही, निर्माता-दिग्दर्शकाचीही करणी आहे, हे वेगळं! हा चित्रपट म्हणजे इम्रान खानचा "जाने तू ना जाने ना' (आमीर खानची निर्मित) आणि आमीर खानचा "दिल चाहता है' या चित्रपटांचं कॉम्बिनेशन असल्याचे चित्रपट पाहताना जाणवत राहतं. अनेक प्रसंग "दिल चाहता है'ची थेट आठवण करून देतात, त्यात भर म्हणून इम्राननं अभिनयातही मामाची कॉपी केली आहे.</description>
पतंगाच्या प्राक्तनाची प्रेमकथा...
    <description>श्रीपाद ब्रह्मे राकेश रोशनचे चित्रपट कायमच "परिपूर्ण मनोरंजना'ने भरलेले असतात. त्याचा नवा "काइट्‌स'ही त्याला अपवाद नाही. या वेळी राकेश रोशनने प्रथमच दिग्दर्शनाची धुरा स्वतः न सांभाळता बॉलिवूडच्या नव्या पिढीचा दिग्दर्शक अनुराग बसूकडं दिली. आणि या बदलाचं फळ राकेशला नक्कीच मिळालं आहे. राकेश रोशनच्या चित्रपटांत असणारं भव्यदिव्य, परिपूर्ण मनोरंजन आणि त्यात अनुरागनं टाकलेला "आत्मा' या संयोगाच्या जोरावर हा "पतंग' हवेवर जोरदारपणे स्वार झाला आहे.  "काइट्‌स' ही एक प्रेमकथा आहे. बॉलिवूडमधील बड्या घराण्यांनी आतापर्यंत अनेक हिरोंना मोठं करण्यासाठी भव्य-दिव्य प्रेमकथा काढल्या. "काइट्‌स'ही त्याहून खूप वेगळी आहे, असं नाही. मात्र, तरीही ती आजच्या काळातली प्रेमकथा आहे. देश, भाषा, धर्म या सर्व सीमा ओलांडून खरं प्रेम दशांगुळे वर उरत असतं. हा प्रेमकथांचा सनातन, पण मूलभूत संदेश अनुरागनं खास त्याच्या शैलीत दिल्यानं "काइट्‌स' मनाला स्पर्शून जातो.</description>