Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 818
भाजप - मगो युतीला निवडून आणण्याचे आवाहन पणजी, ता. 5 (प्रतिनिधी)- येत्या 3 मार्चला होणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील भारतीय भाषा सुरक्षा मंचने सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाविरूद्ध रणशिंग फुंकले असून मातृभाषेवर घाला घालणाऱ्या कॉंग्रेसला पराभूत करा आणि भाजप - मगो युतीला सत्तेवर आणा अशी हाक दिली आहे. पणजीत आज (रविवारी) गोमंतक मराठा समाज सभागृहात गच्च भरलेल्या राज्यातील तालुका पालक महासंघ प्रतिनिधी तसेच भाषाप्रेमींच्या महामेळाव्यात अखिल गोवा पालक महासंघाची स्थापना करून अस्थायी समिती जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसच्या विरोधातील ठराव संमत करून विधानसभा निवडणुकीत पुढील कृतीविषयीही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या अध्यक्ष शशिकलाताई काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महामेळाव्याला मंचचे पदाधिकारी ऍड. उदय भेंब्रे, नागेश करमली, पुंडलिक नाईक, पांडुरंग नाडकर्णी, अरविंद भाटीकर, एन. शिवदास, प्राचार्य सुभाष वेलिंगकर, अनील सामंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उदय भेंब्रे म्हणाले, आपली सद्‌स्‌दविवेकबुद्धी जागवण्याची आज गरज आहे.
Monday, February 06, 2012 AT 12:45 AM (IST)
काणकोणमधून तवडकर पर्वरीत पर्वतकर पणजी, ता. 5 (प्रतिनिधी)ः भारतीय जनता पक्षाने आज रात्री नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपले 22 उमेदवार नक्की केले. अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सत्यविजय नाईक, विश्वजित कृष्णराव राणे व माथानी साल्ढाना यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. सांगे मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार वासुदेव मेंग गावकर यांचे नाव पहिल्या यादीत नाही. उद्या उर्वरित 9 मतदारसंघासाठीचे उमेदवार नक्की करण्यात येणार आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत गडकरी यांच्यासह पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय सरचिटणीस अनंतकुमार, संघटन सचिव रामलाल, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्मृती इराणी, सचिव व्ही. सतीश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकर आणि सरचिटणीस सतीश धोंड सहभागी झाले होते.
Monday, February 06, 2012 AT 12:00 AM (IST)
- युतीवर शिक्‍कामोर्तब कुंभारजुवेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक पणजी, ता. 5 (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातील बहुचर्चित युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाले. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या उपस्थितीत या युतीची आज सकाळी घोषणा केली. त्यानुसार थिवी, प्रियोळ, मडकई, फोंडा, दाबोळी, नुवे, बाणावली आणि केपे मतदारसंघात मगोचे उमेदवार असतील. भाजपचे उमेदवार 31 मतदारसंघात असतील तर कुंभारजुवेत अपक्ष उमेदवाराला दोन्ही पक्ष पाठिंबा देणार आहेत. स्थानिक नेत्यांनी युतीची बोलणी केली होती. एक दोन मतदारसंघाबाबत एकमत होत नव्हते, त्याबाबत काल रात्री आणि आज सकाळी बोलणी झाली व उभयमान्य गोष्टी अंतिमतः ठरवण्यात आल्या. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांची युती व्हावी, अशी जनतेचीही प्रबळ इच्छा होती. त्यानुसार ही युती झाली असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे सरकार येणार याची खात्री 101 टक्के आहे.
Monday, February 06, 2012 AT 12:00 AM (IST)
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना दिले आदेश पणजी, ता. 5 (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 6 ते पुढील सोमवारी 13 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून त्यासाठी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पोलिसांना आवश्‍यक ते आदेश दिले आहेत. सत्ता संपादनासाठी सध्या राज्यात राजकीय पक्षांत उमेदवारी जाहीर करण्यापासूनच सुंदोपसुंदी जाणवत असल्याने उमेदवारी दाखल करण्यापासून ते प्रचारापर्यंत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस सतर्क आहेत. निवडणुकीत वातावरण निर्मिती व्हावी तसेच उमेदवारी अर्ज भरतानाच बोलबाला व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून उमेदवार अनेक युक्‍त्या, क्‍लृप्त्या अमलात आणून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा अट्टहास करीत असल्याने त्यातून प्रतिस्पर्धी उमेदवारांत तेढ निर्माण होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी उमेदवारी दाखल करण्यात येणाऱ्या कार्यालयापासून या उमेदवारांच्या समर्थकांना दूर ठेवण्यात येणार आहे.
Monday, February 06, 2012 AT 12:00 AM (IST)
कॉंग्रेस सदस्यपदाचा राजीनामा सादर वाळपई, ता. 5 (प्रतिनिधी) ः वाळपईचे माजी आमदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते बंडू देसाईंनी अखेर आज सकाळी पणजी कॉंग्रेस कार्यालयात सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय आज जाहीर केला. वाळपईत आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देसाई पुढे म्हणाले, की लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार हिसकावून घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. विश्‍वजित राणे हे मागील विधानसभा निवडणुकीत वाळपईतून अपक्ष म्हणून उभे राहिले होते. ते त्यावेळी कॉंग्रेसचे कोणीही नव्हते. अचानक त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला व पोटनिवडणुकीत त्यांना कॉंग्रेसचे तिकीट मिळाले. मी अनेक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये कार्यरत आहे. यावेळी मी वाळपईतून तिकिटासाठी दावा केला होता. पण ही मागणी धुडकावून लावली. वाळपईतील मुस्लीम बांधवांवरदेखील अन्याय झाला असून मशीद बांधण्यासाठी देखील मालकी हक्क मिळालेला नाही, याकडे राणेंनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कुमेरीचा प्रश्‍न तसाच पडून आहे.
Sunday, February 05, 2012 AT 09:32 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: