Last Update:
 
ऊर्जा

इतक्‍यात आकाशी निळ्या रंगाचा सुंदर सलवार-कमीज घालून एक मुलगी जवळ येऊ लागली. एक क्षण त्यांची नजरानजर झाली, नी तो हरवून गेला, "हीच का ती?' गोऱ्यापान चेहऱ्यावर दोन भावस्पर्शी डोळे, ज्यात बुडून जावे! सरळ नाक, गुलाबी ओठ... ती खट्याळ हसली.

Tuesday, February 14, 2012 AT 01:00 AM (IST)

आजकालचे प्रेम म्हणजे आईस्क्रीमप्रमाणे आहे, जे गोड आहे, आकर्षक आहे आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे! पण जरा त्याला उन्हाची म्हणजेच अविश्‍वासाची झळ बसली, की ते विरघळून जाते आणि त्याचे अस्तित्व नष्ट होते. प्रेम म्हणजे पावित्र्याचे प्रतीक. प्रेम म्हणजे मांगल्य, प्रेम म्हणजे वात्सल्य, प्रेम म्हणजे भूतदया. पण 14 फेब्रुवारीचं प्रेम त्याहून खूप वेगळं असतं. त्यात थोडं प्रेम, पण आकर्षण जास्त! प्रेमीयुगल या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

Tuesday, February 14, 2012 AT 12:45 AM (IST)

जीवन हे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम आहे. पण तरीही आपण जर ठरवलं तर आपण फक्त आनंदातही जगू शकतो. सूर्यप्रकाशाइतकी प्रखर आशा धरून जर आपण दुःखातून वाट काढली तर सुखाच्या दारात पोचण्याचा जो आनंद असेल त्याचे वर्णन शब्दात करूच शकणार नाही. आपल्या जीवनात येणारी दुःख, संकटेच तर आपल्या जीवनाचा रोमांच वाढवतात.

Monday, February 13, 2012 AT 12:30 AM (IST)

कॉलेज जीवनात अनेक रोमांचकारी अनुभव येत असतात. काही क्षण असे असतात जे चिरकाल स्मृतीत राहतात. शिक्षणाबरोबरच कॉलेज गॅदरिंग, स्पोर्टस्‌, पिकनिक, स्टडी टूर या गोष्टी शक्‍यतो विसरता येत नाहीत. म्हणूनच कॉलेजचे दिवस अविस्मरणीय ठरतात. नवनवीन अनुभव अशा सहलींमधून मिळत असतात. शिक्षणाबरोबर असलेलं मैत्रीचं, प्रेमाचं, आपुलकीचं नातं वर्गात अनुभवणं अशक्‍यच असतं, कारण त्यावेळी "शिक्षण एके शिक्षण' सुरू असतं.

Monday, February 13, 2012 AT 12:15 AM (IST)

"प्रेम' म्हटल्यावर आजकालच्या नव्या पिढीला girl friend & boy friend हेच दृष्य दिसतं. पण थांबा! या प्रेमापलीकडेही अनेक अशी प्रेमाची नाती आहेत, ज्यांची तुलना आपण आणखीन कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही. आई-वडिलांचे मुलांवरील, भावाचे बहिणीवरील, बहिणीचे-बहिणीवरील, भावाचे-भावावरील प्रेम अशी वेगवेगळी प्रेमाची नाती आहेत. ही नाती रक्ताची आहेत, पण यात प्रेमाची मधुरता आहे. एकदा बसने प्रवास करीत असताना, माझ्या जवळ एक बाई दोन लहान मुलांना घेऊन बसली होती.

Monday, February 13, 2012 AT 12:00 AM (IST)

पणजी, ता. 8 : महाविद्यालयीन विद्यार्थी म्हटले म्हणजे चित्रपट, सिनेमासंगीत व गजबजाट असे चित्र दिसते. महाविद्यालयीन विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अथवा स्पर्धेत सिनेमातील नृत्य, एखादा डायलॉग अथवा एखादे सुपरहिट गाणे सादर करतात. देशप्रेमावरील भाषणे अथवा परंपरेमध्ये त्यांना फारसा रस नसतो. करिअर घडविताना मॉडर्न फॅशन्स व मॉडर्न जग त्यांना अधिक भावते.

Wednesday, February 08, 2012 AT 10:13 PM (IST)

र विवारचा दिवस होता आणि कॉलेजला सुट्टी असल्याने संपूर्ण दिवस बसून काय करणार? म्हणून मग आमच्या लाडक्‍या समृद्धीला विचारलं, "बाय आज पक्षी निरीक्षणाला जाऊया का गं?' तर जन्मजातच निसर्गाशी आत्मीयता असलेल्या आणि आपली नाळ निसर्गाशी बांधलेल्या समृद्धीने जर या प्रश्‍नाचं उत्तर द्यायला विलंब केला असता, तर नवलच म्हणायचं! ती एका पायावर तयार झाली आणि नेहमी सकाळी दहापर्यंत झोपणारी समृद्धी रविवारी सात वाजताच उठली होती.

Wednesday, February 08, 2012 AT 10:12 PM (IST)

क धी कधी मनात विचार येतो, भ्रमणध्वनी म्हणजेच आताच्या युवावर्गाच्या भाषेत सांगायचं म्हणजे मोबाईल ही वस्तू खरंच जादुई आहे ना! एखाद्या आगपेटीच्या आकाराचा हा भ्रमणध्वनी अख्ख्या जगाला आपल्या मुठीत ठेवतो. एखादी गोष्ट आपल्या मित्रमैत्रीणींना आत्ताच्या आत्ता सांगायची असेल, तर एक मेसेज पाठवली, की झालं काम! अगदी सुरवातीला जेव्हा हा भ्रमणध्वनी बाजारात आला होता, तेव्हा अगदी कंपासपेटीच्या आकाराचा होता.

Tuesday, February 07, 2012 AT 09:59 PM (IST)

सो ने म्हटले की स्त्रियांचे डाळे लगेच विस्फारतात. कारण सोने म्हणजे स्त्रियांचा एक मुख्य सौंदर्यालंकार आहे. तसेच त्याला आजच्या काळात जीवनातील एक आर्थिक सुरक्षित ठेव म्हणूनही पाहिले जाते. अडल्यानडल्यावेळी हेच दागिने आपल्याला उपयोगी येतात. सोने म्हणजे मात्र एक धातू, परंतु त्याच्या आकर्षक गुणामुळे आज त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Monday, February 06, 2012 AT 11:04 PM (IST)

ए क गोष्ट ऐकली. "एका माणसाला राजाचे गुपित कळाले. ते गुपित तो लपवून ठेवू शकत नव्हता, म्हणून त्याचे पोट फुगू लागले. राजाचे गुपित म्हणून, तो कोणाकडे बोलूही शकत नव्हता. त्यामुळे त्याचे पोट गुपित साठवून ठेवल्यामुळे फुगू लागले. मग तो एका झाडाकडे गेला व आपल्या मनातले गुपित त्या झाडाला सांगितले'. गोष्ट अजूनही पुढे आहे, पण मला सांगायचंय, ते हे की माणूस मनातल्या गोष्टी मनात ठेवू शकत नाही. त्याला त्या कोणाला तरी सांगाव्याशा वाटतात.

Monday, February 06, 2012 AT 11:03 PM (IST)

जन्म-मृत्यू हे नियतीच्या पोटात दडलेलं रहस्य आहे. माणूस भावनाप्रधान असल्याकारणानं आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूवेळी आक्रोश करतो. आपल्या नशिबाला दोष देतो. पण नशीब आपल्याच वाटेनं चालतं. म्हणून प्रत्येक माणसानं आपणही सुखी राहावं अन्‌ दुसऱ्यालाही आनंदी ठेवावं. शेवटी मरण हे येणारंच... जो माणूस जन्माला येतो, त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागतं. माणसाचा जन्म एक आनंदाचा क्षण, तर मृत्यू हा डोळ्यातून अश्रू ओघळणारा क्षण.

Sunday, January 29, 2012 AT 10:06 PM (IST)

प्रत्येक नातं अमूल्य असतं. कारण हीच नाती आपल्या आयुष्यात केव्हा ना केव्हा उपयोगी पडतात. हाच निसर्गाचा नियम आहे. म्हणून नाती केव्हाच तोडू नयेत. ही नाती तोडण्यापेक्षा निभावणं खूप गरजेचं आहे. जर कुणी एक चूक केली असेल तर त्याला माफ करून त्या माणसाशी नातं निभवा. ते तोडू नका. कारण चुका सुधारता येतात. पण जी नाती तुटून जातात ती परत जोडता येत नाहीत. नाते जुळले मनाशी मनाचे... ना ती ही खूप नाजूक असतात. त्यांना खूप जपावं लागतं.

Sunday, January 29, 2012 AT 10:04 PM (IST)

कॉलेजचे एखादे फ्रेंडसर्कल, ग्रुप यांनी जर सायकल वापरायला सुरवात केली, तर काळाच्या ओघात खेळणं बनून अस्तित्वात उरलेली सायकल पुन्हा एकदा फॅशनच्या जगात नव्या ढंगाने पदार्पण करेल, यात शंका नाही... आणि तसेही, जर आम्ही आज इंधनावर करत असलेला अमर्याद खर्च कमी केला नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला बाय फोर्स सायकल वापरावीच लागेल. "ब त्तीस तारांवर बसला मामलेदार...' दादा, दादा... या कोड्याचे उत्तर सांग! मुलांचा दादा विचार करून करून थकला.

Sunday, January 29, 2012 AT 10:00 PM (IST)

ज सजसा काळ बदलत गेला, तशी शिक्षणक्षेत्रातही प्रगती होत गेली. आजकाल वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या बळावर माणसाने मोठमोठी शिखरे प्रादाक्रांत केली आहेत. पण अशावेळी माणूस कुठेतरी आपली परंपरा, संस्कृती सोडून इतर संस्कृतीवर जास्त भर देऊ लागला. याच विकासाच्या दुनियेत माणसाच्या राहणीमानात, आचारविचारांमध्ये बदल होत गेला. याच बदलामुळे नातेसंबधांमध्ये एकतऱ्हेची तेढ निर्माण होत गेली आणि यातूनच "जनरेशन गॅप' वाढत गेला आहे.

Saturday, January 28, 2012 AT 12:30 AM (IST)

प्र त्येक गावाच्या वेगवेगळ्या चालीरीती असतात. प्रत्येक गावात वेगवेगळे सण साजरे केले जातात. काही सणात पुरुष सहभागी असतात, तर काही सणात फक्त स्त्रियाच सहभागी असतात. आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या थंडीच्या दिवसात बायकांचा आवडता सण जवळ आलेला आपल्याला दिसतो. कधी एकदा धाल्यांची पुनव येते, याची वाट बायका पाहत बसतात. पाट्ये गावातल्या बायकाही अशाच धाल्याच्या मांडासाठी आसुसलेल्या. पाट्यात धाल्याची परंपरा पूर्वीपासूनच चालू आहे.

Wednesday, January 25, 2012 AT 01:00 AM (IST)

नु कतेच मी नटसम्राट नाटक पाहिले. हे नाटक वास्तवता दाखवणारे आहे. नाटकाच्या मुख्य भूमिकेतील अप्पासाहेब बेलवलकर कोणे ऐके काळी रंगभूमी गाजवणारे नटसम्राट होते. मुलांवर मनापासून प्रेम करणारे एक पिता होते. पण त्यांच्या म्हातारपणी मुले आपल्या कर्तव्याला जागली नाहीत. पदोपदी होणारा अपमान अप्पासाहेबांना सहन झाला नाही. म्हातारे असले, तरी ते स्वाभिमानी होते. रस्त्यावर मरण पत्करले, पण मुलांच्यापुढे झुकले नाहीत.

Sunday, January 22, 2012 AT 09:28 PM (IST)

ए कदा काय झाले, की माझ्या काकाच्या लहान मुलाने काजूच्या झाडावर एक लहानसे कावळ्याचे घरटे पाहिले आणि त्याने दगडाने नेम धरून कावळ्याचे घरटे खाली पाडले. आपले घरटे खाली पडलेले पाहून बिचारे कावळे मोठमोठ्याने ओरडू लागले. मला हे पाहून खूपच वाईट वाटले व काकाच्या मुलाला असे न करण्यास मी सांगितले.  आपण मुक्‍या प्राण्यांना उगाचच त्रास देतो. जर त्या कावळ्याप्रमाणे आपले घर कुणी पाडले असते, तर आपल्याला किती दुःख झाले असते.

Thursday, December 29, 2011 AT 01:00 AM (IST)

पि ढ्या बदलतात, तसे माणसांचे राहणीमान बदलते. माणसाचे विचारही बदलत जातात. प्रत्येक घरातील ज्येष्ठ मंडळी आणि नवी पिढी यामध्ये आपणास एक अंतर दिसते. खानपान, कपडे किंवा वागण्यावरुन हे अंतर दिसून येत असते. आपली संस्कृती महान आहे. मोठ्या माणसांचा आदर करणे आपल्या संस्कारात आहे. मोठ्यांचे ऐकणे हे आपले कर्तव्य आहे. पण काही गोष्टी आम्हा मुलांना आवडतात, त्या मोठ्या माणसांना आवडत नाही व मोठ्यांना आवडतात, त्या आम्हाला नाहीत.

Friday, December 16, 2011 AT 01:00 AM (IST)

नन्हीं चिटी दाना लेके दिवार पे चढती है, चढते वक्त दिवार से सौ बार फिसलती हे, फिर भी उसकी कोशिश कम नही होती, कोशिश करनेवालोकी कभी हार नही होती। या ओळी मनाला सदैव भावतात आणि या ओळीतील मुंगीही. इवलीशी मुंगी सहजपणे दिसतही नाही, पण कष्ट कसे करावे? प्रयत्न कसे करावे, हा धडा मात्र शिकवून जाते. खरंच स्वत:च्या वजनापेक्षा दहापट वजन पेलणारी ही मुंगी ग्रेटच नाही का? कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी हिम्मत हरत नाही. प्रयत्न करत राहते.

Friday, December 16, 2011 AT 12:45 AM (IST)

या जगात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा कोणता ना कोणता धर्म वा देव असतो. पण या जगात माणुसकी नावाचा धर्म केव्हा जन्माला येणार आणि आलाच तर त्या धर्माचे किती लोक जन्माला येणार, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. कोणी आपल्याकडे मदत मागितली, तर त्याला माणुसकीच्या नात्याने कोणी मदत करणार का? नाही. प्रथम आपण त्याचा धर्म बघतो. मग त्याची जात. आपल्या जातीचा-धर्माचा असला, तरच आपण त्याला मदत करतो. नाहीतर कुणाला कुणाचं काहीच देणं नसतं.

Thursday, December 15, 2011 AT 01:00 AM (IST)

प्र त्येक माणसाला वेगवेगळे छंद असतात. शंख-शिंपले गोळा करणे, विविध तऱ्हेची पुस्तके वाचणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, कडधान्यापासून गणपती बनविणे अशा कितीतरी गोष्टींचा छंद असतो. अशाच प्रकारच्या छंदातून नारायण च्यारी यांनी विविध वस्तू साकारलेल्या आहेत. नुकतेच डिचोलीतील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्राचार्य गोविंद अवखळे सरांनी नारायण च्यारी यांनी साकारलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते.

Thursday, December 15, 2011 AT 12:45 AM (IST)

सु ट्टी पडली होती, तेव्हा या सुट्टीत काय करावं? हा प्रश्‍न होता. पण दिवस येत होते आणि असेच जातही होते. तेव्हाच मला कळलं, की संवर्धन या संस्थेने अभ्यास दौरा आयोजित केला आहे आणि तोसुद्धा रायगडला. मी बाहेरून ऐकलं होतं, की रायगड हा खूपच उंचावर किल्ला आहे. मला तो प्रत्यक्षात बघायचा होता. पण संधी मिळत नव्हती. रायगडचा विचार करीत असताना अशी ही संधी आली होती. मी तेव्हाच ठरवलं, की या दौऱ्याला जायचे आणि मी माझी जाण्याची तयारी केली.

Tuesday, December 13, 2011 AT 01:00 AM (IST)

क धी कधी मी जेव्हा एकटीच बसते, तेव्हा माझ्या मनात अनेक विचार येतात. माणसाचे जीवन किती निर्मळ आहे, किती सुंदर आहे, असा विचार माझ्या मनात येऊ लागतो. जीवनावर अनेक कविता रचलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे लेखनही केले आहे. पण मनुष्य मात्र या सुंदर जगण्याला मागे टाकून, नको ते विचार मनात आणून वाईट मार्गावर जातो. मनुष्य आहे त्यात सुखी राहत नाही, तर तो आपल्याला चांगले खायला, प्यायला मिळत नाही या रागाने स्वतःवरच वैतागून आदळआपट करतो.

Tuesday, December 13, 2011 AT 12:45 AM (IST)

गोमंतकीय भूमी ही खरंच एक पुण्यभूमी, पवित्र अशी भूमी आहे. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्यावर तेथील आराध्य देवतेचे एकतरी मंदिर असतेच. गोमंतकीय जनतेची मने सदैव देवाच्या श्रद्धाने भरलेली असतात. गोमंतकीय जसे मनाने थोर, तशीच त्यांची संस्कृतीही थोर. ही संस्कृती जपण्यासाठी येथील लोक सदैव धडपडत असतात व यासाठी मदत होते ती येथील गावोगावच्या मंदिरामध्ये साजरे होणाऱ्या उत्सवांची.

Monday, December 12, 2011 AT 01:00 AM (IST)

सावली हा शब्द कुणाला ठाऊक नाही, असे नाही. तिला छाया, शॅडो, सावट वगैरे असे अनेक प्रतिशब्द आहेत. सावलीची ओळख आपल्याला लहानपणातच होते. काही मुलं तर (काहीवेळा मोठी माणसेसुद्धा) आपल्या सावलीला भीतात. मोठे झाल्यावर मात्र सावली म्हणजे काय, हे कळायला लागल्यावर हसू येते.  सूर्याच्या उन्हात पडणारी सावली नैसर्गिक, तर दिव्याच्या उजेडात पडणारी अकृत्रिम सावली या दोन्ही सावल्याच.

Monday, December 12, 2011 AT 12:45 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: