|
देश-विदेश
अयोध्या, ता. 5- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी राम मंदिराचा मुद्दा घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराच्या मुद्याला हवा दिली आहे. याच मुद्यावर यंदाही मते मिळतील, असा अडवानींना विश्वास वाटतो आहे. "माझे उद्दिष्टे तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अयोध्येत राम मंदिर उभे राहील,' असे विधान अडवानी यांनी येथे जाहीर सभेत केले आहे.
Sunday, February 05, 2012 AT 08:40 PM (IST)
नवी दिल्ली, ता. 5 - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. "आयआरसीटीसी'कडून आलेला "एसएमएस' हेच नवे तिकीट असेल. या "एसएमएस'मध्ये बदल केला जात आहे.
Sunday, February 05, 2012 AT 08:39 PM (IST)
लखनौ, ता. 5 ः उत्तर प्रदेशातील निवडणूक साऱ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असल्याने एरवी क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांनीही जोरदार तयारी केली आहे पण निकाल काय लागणार? याबाबत तेही संभ्रमातच आहेत. त्यामुळे अद्याप सट्टेबाजारात तेजी दिसून येत नाही. या वेळी निकालांवर दहा कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. निकालाचा अंदाज येत नसल्याने सट्टेबाजारात फार तेजी असणार नाही, अशी माहिती एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
Sunday, February 05, 2012 AT 08:37 PM (IST)
हैदराबाद, ता. 5 : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (टीटीडी) अंतर्गत कारभारात श्री त्रिदंडी चिनाजिअर स्वामी यांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट मत राज्याचे देणगीमंत्री सी. रामचंद्रय्या यांनी आज व्यक्त केले. "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना रामचंद्रय्या यांनी सांगितले, की भाविकांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागतच केले जाईल. प्रत्येक भाविकाने आपल्या सूचना मांडाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.
Sunday, February 05, 2012 AT 08:36 PM (IST)
पाटणा, ता. ५- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या वर्षी पुकारलेल्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याची हजारे कबुली का देत नाहीत? असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) केला. यासंदर्भात भागवत म्हणाले,""भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात संघाचे कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर सक्रिय सहभागी झाले होते.
Sunday, February 05, 2012 AT 06:56 PM (IST)
अलाहाबाद, ता. ५ - समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार अमरसिंह यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी कॉंग्रेस पक्षात आहे, असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आज (रविवार) व्यक्त केले. कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी अलाहाबादला आलेला संजय दत्त म्हणाला,""मी कॉंग्रेसमध्ये पुनरागमन करावे असा सल्ला अमरसिंह यांनी मला दिला होता. त्यांच्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये आहे. फार पूर्वीपासून माझ्या कुटुंबाचा कॉंग्रेसशी संबंध आहे.
Sunday, February 05, 2012 AT 06:52 PM (IST)
नवी दिल्ली, ता. ५ - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे.   एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही.
Sunday, February 05, 2012 AT 04:27 PM (IST)
वॉशिंग्टन, ता. ५ - सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाली. फेसबुकचे सध्या ८० कोटी ४५ लाख युजर्स जगभरात आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात १०० कोटींचा आकडा पार करण्याची कंपनीची योजना आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ४ फेबुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात केली होती. झुकेरबर्ग यांच्यासह एड्युर्डो सेवरीन, डस्टीन मोस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युज या तिघांचा समावेश होता.
Sunday, February 05, 2012 AT 04:26 PM (IST)
पतियाळा, ता. ५ - काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी असलेले अभिनेते ओम पुरी यांनी अण्णा हजारे यांना अशिक्षित आणि दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. ओम पुरी यांनी अण्णांच्या मोहिमेला योग्य म्हटले असले तरी, अण्णांना चार जणांकडून खेळविले जात असल्याचे सांगितले. येथील राजपुरामध्ये कार्यक्रमात बोलताना ओम पुरी म्हणाले, ''अण्णा हजारे प्रामाणिक असून, एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांचे शिक्षण कमी झाले आहे.
Sunday, February 05, 2012 AT 04:25 PM (IST)
(पीटीआय)   नवी दिल्ली - "केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना टू जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारात सहआरोपी करून घ्यावे,' अशी मागणी करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गृहमंत्र्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए.
Saturday, February 04, 2012 AT 08:11 PM (IST)
मुंबई, ता. ४ - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा आहे ती गर्भवती असल्याची. खरेच गर्भवती आहे काय? विमानतळावर आलेल्या करीनाने हिरव्या रंगाचा लांब टीशर्ट घातला होता.
Saturday, February 04, 2012 AT 08:09 PM (IST)
वॉशिंग्टन, ता. ४ - कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन, मानवी शरीराला घातक ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या मते साखरेचाही त्यात समावेश आहे. मानवी शरीरासाठी साखर विषारी असून, सरकारने मद्याप्रमाणेच साखरेच्या सेवनावरही नियंत्रण आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. निसर्ग रक्षणाला वाहिलेल्या नेचर या नियतकालिकाच्या ताज्या अंकात, कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॉबर्ट लुस्टिंग यांच्या नेतृत्त्वाखालील शास्त्रज्ञांच्या एका पथकाने हा शोध लावला आहे.
Saturday, February 04, 2012 AT 08:08 PM (IST)
इंफाळ, ता. ४ - मणिपूरमध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघांतील 34 मतदान केंद्रांवर फेरमतदान झाले. मतदानावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सात ते दुपारी 3 या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडली. राज्यात विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 जानेवारीला मतदान झाले होते. मात्र, 34 मतदान केंद्रांवर झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार झालेल्या केंद्रांवर आज पुन्हा मतदान घेण्यात आले.
Saturday, February 04, 2012 AT 08:07 PM (IST)
  काबूल - अफगाणिस्तानमधील युद्धात गेल्या वर्षभरात तब्बल 3 हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युद्धात सामान्य नागरिकांचा बळी जाण्याची संख्या गेल्या 5 वर्षांपासून वाढतच असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे पाश्चिमात्य देश आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Saturday, February 04, 2012 AT 08:06 PM (IST)
पणजी, ता. 2  ः गेल्या काही दिवसांपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे इस्पितळात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे तसेच इस्पितळातील आरक्षित जागांसाठी तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने मोठी समस्या उद्भवली आहे. मेडिसीन, सर्जरी आणि ऑर्थोपेडिक विभागात सुमारे 20 तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे.
Thursday, February 02, 2012 AT 10:26 PM (IST)
पणजी, ता. 2  ः भारतीय भाषा सुरक्षा मंचाने प्राथमिक पातळीवर सरकारने केलेल्या माध्यम बदलाचा विषय पुन्हा ऐरणीवर आणण्याचे ठरविले आहे. गेले काही महिने तालुका पातळीवर संघटन केल्यावर आता मंचाने येत्या रविवारी (ता. 5) पालक महासंघाच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला आहे. 500 पालक संघाचे प्रतिनिधी या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.
Thursday, February 02, 2012 AT 10:20 PM (IST)
सिडनी, 1 - मॅथ्यू वेड याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. सिडनीतील ऑलिंपिक पार्क मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवार डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांनी चांगली सुरुवात करून देत जोरदार फटकेबाजी केली.
Wednesday, February 01, 2012 AT 05:34 PM (IST)
कराची, 1 - जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाला पाकिस्तान पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून व्हाईटवॉश देईल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे. आफ्रिदी म्हणाला, ''मला वाटतेय की, पाकिस्तान तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा सहज पराभव करेल. पाकिस्तानला ही मालिका ३-० अशी जिंकण्याची चांगली संधी आहे. सध्याच्या संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करीत असून, त्यांना यश मिळत आहे.
Wednesday, February 01, 2012 AT 05:31 PM (IST)
इस्लामाबाद, 1 - पाकिस्तानच्या लढावू जेट विमानातून दहशतवाद्यांच्या दोन ठिकाणांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 31 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सरकारने दिली. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी तालिबानचा नेता मोईन उद दिन याचा समावेश आहे, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
Wednesday, February 01, 2012 AT 05:30 PM (IST)
नवी दिल्ली, 1 - भारत देश जगामध्ये मुलींसाठी सर्वात धोकादायक असल्याचे, संयुक्त राष्ट्र संघाने नव्याने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ते ५ वयोगटातील मुलींचे मृत्यूचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ७५ टक्के जास्त आहे. तसेच स्त्री-पुरूष समानतेतही भारतात मोठ्या प्रमाणात अंतर वाढत चालले आहे.
Wednesday, February 01, 2012 AT 05:26 PM (IST)
इस्लामाबाद, 1 - राष्ट्रपती असिफ अली झरतारी यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई न केल्याप्रकरणी पंतप्रधान युसूफ गिलानी यांच्याविरुद्ध आज पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायालयाने गिलानी यांना नोटीसही बजावली होती. मागील सुनावणीच्या वेळी गिलानी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, त्यांनी या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला होता.
Wednesday, February 01, 2012 AT 05:20 PM (IST)
ऑकलंड (अमेरिका), 29 - रिकामे सभागृह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट'च्या सुमारे 100 आंदोलकांना पोलिसांनी आज (रविवार) अटक केली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट'च्या आंदोलकांनी आज ठिकठिकाणी प्रचंड निदर्शने केली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काही आंदोलकांनी रिकामे सभागृह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
Sunday, January 29, 2012 AT 09:52 PM (IST)
सोनेपत, 29 - हरियाणातील रोहतक आणि सोनेपत जिल्ह्याला आज (रविवार) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सुदैवाने भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.   3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. हादरे जाणवू लागल्याने धास्तावलेले नागरिक रस्त्यावर आले. 40 ते 50 सेकंदाचा हा धक्का होता.  10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र होते. 
Sunday, January 29, 2012 AT 09:51 PM (IST)
लखनौ, 29 - वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने पोलिस निरीक्षकाचा अपमान केल्याने उत्तर प्रदेशमधील 2006च्या तुकडीतील सात आयपीएस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेमार्फत हे राजीनामे सादर करण्यात आले. सिद्धार्थ नगरचे पोलिस निरीक्षक मोहित गुप्ता यांची अचानक बदली केल्याने संतप्त होऊन धर्मेंद्रकुमार, आकाश कुल्हारी, एल. आर. कुमार, शलभ माथूर, डॉ. मनोजकुमार, हॅपी गुप्तन आणि विनोद कुमार या आयपीएस अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.
Sunday, January 29, 2012 AT 09:49 PM (IST)
नवी दिल्ली, 29- रेल्वेचे उत्पन्न घसरत असल्याचे कारण पुढे करत वातानुकूलित श्रेणी प्रवासाच्या भाड्यात 10 ते 12 टक्के वाढ करण्याचे सूतोवाच केंद्रीय वित्त विभागाकडून मिळत आहेत.   गेली आठ वर्षे रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. मात्र आता रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय वित्त विभाग आणि नियोजन मंडळाच्या सूचनेनुसार एसी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव रेल्वे महामंडळ तयार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Sunday, January 29, 2012 AT 09:46 PM (IST)
|