|
गोवा
पणजी, ता. 20 ः राज्याच्या लोकायुक्तपदी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास किनगावकर यांची नियुक्ती करण्यासंदर्भात सरकारने विचार सुरू केला आहे. दरम्यान, गोवा सरकारने आपल्याशी अद्याप त्यासाठी संपर्क साधलेला नाही असे न्या. किनगावकर यांनी सांगितले. ते सध्या औरंगाबाद येथे आहेत.  याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, गोमंतकीय संबंध नसणारी व्यक्ती या पदावर असावी असा विचार सरकारने चालविला आहे.
Monday, May 21, 2012 AT 04:15 AM (IST)
म्हापसा, ता. 20 ः कळंगुट पंचायतीच्या अकरा प्रभागांसाठी उद्या (ता. 21) निवडणूक होत असून परवा मंगळवारी (ता. 22) पेडे येथील क्रीडा प्रकल्पामध्ये मतमोजणी होणार आहे.  या पंचायतीच्या निवडणुकीत कळंगुटचे आमदार मायकल लोबो, जोसेफ सिकेरा व अँथनी मिनेझिस यांनी आपले पॅनेल्स उभे केले आहेत. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचे समर्थकही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीत जोसेफ सिकेरा व अँथनी मिनेझिस आमदार मायकल लोबो यांच्याबरोबर होते.
Monday, May 21, 2012 AT 04:00 AM (IST)
पणजी, ता. 20 ः दुकानात वा पेट्रोलपंपावर किंवा अन्य ठिकाणी वस्तू खरेदी करताना मापात ग्राहकांची फसवणूक होते. कुणालाही सांगून खरे वाटणार नाही, पण वनजमाप खाते (लीगल मेट्रोलॉजी) दररोज अशा एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई करते. ग्राहकांनी तक्रार करू दे वा नको आम्ही तपासणी करतो व कारवाई करतो, असे खात्याचे संचालक व्ही. आर. नाईक यांनी सांगितले.
Monday, May 21, 2012 AT 03:45 AM (IST)
पणजी, ता. 20 ः "खा, प्या आणि मजा करण्यासाठी गोव्यात या' अशा जाहीरातबाजीने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करता येणार नाही. पर्यटन क्षेत्राची गुणवत्ता वाढवितानाच त्या क्षेत्राच्या विस्तारालाही निर्बंध घालण्याची वेळ येणार आहे. "गोवा व्हीजन 2035' मध्ये तज्ज्ञ समितीने अशी सूचना केल्याची माहिती मिळाली आहे.  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अ ध्यक्षतेखाली या दस्तावेजाच्या अंतिम मांडणीचे काम सुरू झाले आहे.
Monday, May 21, 2012 AT 02:00 AM (IST)
पणजी, ता. 20 ः पर्यटक व्हिसावर गोव्यात येऊन व्यवसाय करणारे आणि व्हिसाची मुदत संपूनही परत न जाणाऱ्या विदेशींची माहिती मिळविणे सरकारने सुरू केले आहे. किनारी भागातील पोलिस ठाण्याच्या प्रभारींना पावसाळ्यापूर्वी अशा विदेशी नागरिकांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.    किनारी भागात कोणते व्यवसाय अनिर्बंधपणे चालतात याची माहिती सरकारने यापूर्वी गोळा केली होती. ती करताना अनेक बेकायदेशीर गोष्टीत विदेशी पर्यटक गुंतल्याची माहिती पुढे आली.
Monday, May 21, 2012 AT 01:45 AM (IST)
पणजी, ता. 20 ः गोवा क्रीडा प्राधिकरणात कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारपदी नियुक्त केलेल्या मिता आजगावकर यांच्या नियुक्तीाविषयी दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. मिताली ही माजी क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांची कन्या आहे. ते क्रीडामंत्री असताना मितालीची त्यांच्याच खात्यात नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रकरणी सुदीप ताह्मणकर यांनी तक्रार केली आहे.
Monday, May 21, 2012 AT 01:30 AM (IST)
पणजी, ता. 20 ः "गोवा कॅन' या बिगर सरकारी संस्थेने रस्त्याशेजारी टाकण्यात येणारा कचरा व मोठी रिळे यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर 48 तासांत रस्त्याशेजारची रिळे हटविण्यात आली. पणजीचे उपविभागीय अधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी याप्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठक झाल्यावर नंतरच्या तीन तासांत रिळे हटविण्यात आली. रस्त्याशेजारी बेवारस अवस्थेत टाकण्यात आलेली मोठी रिळे ही भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी आणलेल्या केबलची होती.
Monday, May 21, 2012 AT 01:15 AM (IST)
मडगाव, ता. 20 ः कोलवा समुद्र किनाऱ्याची आज नागरिकांनीच पुढाकार घेऊन साफसफाई केली. कोलवातील नागरिक व पॅरिश युथ ऑफ कामुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोलवा समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. बिगर सरकारी संस्थांचे सदस्यही या साफसफाईच्या मोहिमेत सहभागी झाले होते. क्लिंटन वाझ व कॅथी कार्दोज यांचा प्रामुख्याने मोहिमेत सहभाग होता.  कोलवा समुद्र किनाऱ्यावर गेल्या दोन महिन्यांपासून पर्यटकांची गर्दी होत आहे.
Monday, May 21, 2012 AT 01:00 AM (IST)
पणजी, ता. 20   ः राज्यात अमलीपदार्थ कुठून येतात याचा छडा लावण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. यात गुंतलेल्यांवर पोलिसांनी नजर ठेवली असून मुंबई व दिल्लीतून हे अमलीपदार्थ गोव्यात येत असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला आहे.  अमलीपदार्थ व्यवहारात नायरेजियन नागरिकही गुंतल्याचे समोर आल्यावर राष्ट्रीय पातळीवरच एखादा गट सक्रीय असावा असे गृहित धरून गेला आठवडाभर पोलिसांनी तपासकाम सुरू केले होते.
Monday, May 21, 2012 AT 12:45 AM (IST)
मडगाव, ता. 20 ः मडगाव शहर हे गोव्याची आर्थिक राजधानी असून कॉंग्रेस सरकारने नियम धाब्यावर बसवून शहराच्या बाह्य विकास आराखड्यात अनेक बेकायदेशीर प्रकार केले आहेत. भाजप मंडळातर्फे या कृतीचा निषेध करण्यात येत आहे. पीडीएच्या नियमांचे उल्लंघन करून शहरात उभारण्यात येत असलेले मेगा प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावेत, असे निवेदन मडगाव भाजप गट मंडळाने पीडीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजन नाईक यांना सादर केले आहे.
Sunday, May 20, 2012 AT 10:13 PM (IST)
पणजी, ता. 20 ः उन्हाच्या झळा अंगातून घामाच्या धारा काढत आहेत आणि उकाड्याने हैराण झालेल्या आम आदमीला सध्या महागाईने अधिकच हैराण करून सोडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाला आणि मासळी खरेदीच्या वाढत्या दराच्या झळा आम आदमीच्या अंगातून घाम काढत आहेत. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे सध्या बाजारपेठेत आलेला मानकुराद आंबा "त्या' मानाने स्वस्त असल्याने ग्राहक हे आंबे खरेदी करताना दिसत आहेत.
Sunday, May 20, 2012 AT 10:12 PM (IST)
कुठ्ठाळी, ता. 20 ः कुठ्ठाळीचे आमदार माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनामुळे कुठ्ठाळी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातर्फे कॉंग्रेसचे तिकीट कॉंग्रेस युवानेते व युवा कॉंग्रेसचे दक्षिण गोवा माजी उपाध्यक्ष रेमंड रूझारियो डिसा यांना देण्यात आले आहे. यानिमित्त घेतलेली ही मुलाखत... 1 प्रश्न ः- रेमंड डिसा तुमचा राजकारणामध्ये येण्यामागचा उद्देश काय? उत्तर ः आपल्या प्रभागामध्ये अशा अनेक अडचणी होत्या.
Sunday, May 20, 2012 AT 10:11 PM (IST)
मडगाव, ता. 20 ः घोगळ येथील सुपीक शेतजमिनीत ख्रिस्ती बांधवांची चर्च उभारण्यास तेथील बहुतेक शेतकऱ्यांनी विरोध केला. या जमिनीत चर्च उभारण्याच्या अनुषंगाने काहीजण आज सकाळी 8 वाजता जागेची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांबरोबर काही लोकांनीही विरोध केला.
Sunday, May 20, 2012 AT 10:09 PM (IST)
काणकोण, ता. 20 ः काणकोण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पाळोळे प्रभागाच्या नगरसेविका राजश्री दिवाकर पागी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी पालिका मंडळाच्या खास बैठकीत ही निवड करण्यात आली.  उपनगराध्यक्ष संदेश गावकर यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा निर्धारित वेळेत दिल्यामुळे हे पद रिक्त होते.
Sunday, May 20, 2012 AT 10:08 PM (IST)
पणजी, ता. 19 (क्रीडा प्रतिनिधी) ः अगोदर जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) 2012-2015 सालासाठी व्यवस्थापकीय समितीची निवडणूक 27 मे रोजीच व्हावी अशी मागणी करणारी याचिका जीसीएच्या संलग्न क्लबांनी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सादर केली आहे. त्यावर मंगळवारी (ता. 22) सुनावणी होईल. दरम्यान, निवडणुकीसंदर्भात तक्रारींवर निवाडा देण्यासाठी जीसीएने नियुक्त केलेल्या लवादाचे काम ऍड.
Sunday, May 20, 2012 AT 01:08 AM (IST)
फोंडा, ता. 19 (वार्ताहर) ः बिहार येथून बेकायदेशीरपणे पिस्तूल आणून त्याची फोंड्यात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोघाजणांना पोलिसांनी छापा टाकून आज रंगेहाथ पकडले. बेकायदेशीर पिस्तूल खरेदी-विक्रीत गुंतलेल्यांची माहिती काढण्यासाठी पोलिस प्रयत्नशील होते याप्रकरणी रात्री उशिरा से ओल्ड गोवा पंचायतीचे नवनियुक्त पंच विनायक फडते यांना अटक करण्यात आली आहे. फडते यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.
Sunday, May 20, 2012 AT 01:07 AM (IST)
पणजी, ता. 19-  केवळ संगीत नाटके सादर करण्यासाठी आईने नाटक कंपनी स्थापन केलेली व मी पोटात असताना आईने भूमिका केलेली आहे. पुढे बालवयात आम्ही तबलजींच्या हौदात बसून टक लावून पूर्ण नाटक बघायचो आणि "टक लावून बघायची गोष्ट म्हणजे नाटक' असे करून नाटक अंगात भिनत गेले. नानांनीही (वडील जयराम शिलेदार) नाटक आमच्यावर लादले नाही. आमच्या नाटकाच्या नकला बघून, आवड बघून नाटक करायला लावलं.
Saturday, May 19, 2012 AT 11:37 PM (IST)
पणजी, ता. 19 (प्रतिनिधी) ः दिल्लीत गोव्यातील दांपत्य क्षमा आणि शैलेश शेट्ये यांच्या अपघातप्रकरणी कारणीभूत ठरलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी एक खास उपक्रम "द ग्रुप जस्टिस टू क्षमा अँड शैलेश शेट्ये'तर्फे मिरामार येथे आज (शनिवारी) आयोजित करण्यात आला. या ग्रुपतर्फे संध्याकाळी मिरामार येथील समुद्र किनाऱ्यावर "कॅंडल लाईट' मेणबत्ती प्रज्वलित करून संघटितरीत्या शेट्ये कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी एकीचे प्रदर्शन करण्यात आले.
Saturday, May 19, 2012 AT 11:35 PM (IST)
पणजी, ता. 19 - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या 9 मार्च रोजी कांपाल येथील क्रीडा प्राधिकरण मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यावर 10,91,782 रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांना मिळाली आहे. पेढे, पाण्याच्या बाटल्या, पॅटिस, बटाटेवड्यांवर पैसा खर्च झालाच शिवाय केटरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सेवा घेतल्यामुळे त्यावरही खर्च झाला.
Saturday, May 19, 2012 AT 11:31 PM (IST)
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः राज्याच्या शिक्षण संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी डी. पी. द्विवेदी यांची नियुक्ती करणारा आदेश सरकारने आज जारी करून शिक्षण उपसंचालक अनिल पवार यांना संचालकपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त केले आहे. सरकारचे अतिरिक्त कार्मिक सचिव यतिंद्र मरळकर यांनी राज्यपालांच्या नावे वरील आदेश संध्याकाळी काढला आहे. श्री. पवार गेली सहा महिने शिक्षण संचालकपद सांभाळत होते. शिक्षण संचालकपदी सुमारे सात वर्षांनी आय. ए. एस.
Saturday, May 19, 2012 AT 01:11 AM (IST)
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः गोवा सी ई टी त प्रथम क्रमांक मिळवलेल्या गौतम मंजुनाथ भट या आर्यन स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्याने आय आय टी प्रवेश परीक्षेत देशात 124 वा क्रमांक पटकावला आहे. गौतम मडगाव येथील दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असून कुडचडे येथील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. मुंबई आय आय टी त तो प्रवेश घेणार आहे.
Saturday, May 19, 2012 AT 01:11 AM (IST)
पणजी, ता. 18 (प्रतिनिधी) ः गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्च 2012 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 22 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी ही माहिती आज प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Saturday, May 19, 2012 AT 01:10 AM (IST)
वास्को,ता. 18 (प्रतिनिधी)ः कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एलिना साल्ढाणा (भाजप), रेमंड डिसा (कॉंग्रेस), रमाकांत बोरकर या तिघा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीनंतर आज ग्राह्य धरण्यात आले आहेत. मात्र बोरकर यांना युगोडेपाकडून "ए' फॉर्म देण्यात न आल्याने त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहावे लागले.
Saturday, May 19, 2012 AT 01:09 AM (IST)
पणजी, ता. 18 ः मोटार वाहन चालक परवान्याच्या चीपमध्ये असलेली माहिती वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे यंत्रणा नसली तरी वाहतूक खात्याकडे मात्र तशी यंत्रणा आहे. वाहन चालक परवानाधारकांविषयी सर्व माहिती या चीपमध्ये साठविण्यात येते, अशी माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली.  ते म्हणाले, वाहन चालकाने शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी कधी अर्ज केला येथपासून त्याने वाहन चालक परवान्यासाठी तोंडी परीक्षा कधी व कोणासमोर दिली.
Friday, May 18, 2012 AT 10:00 PM (IST)
पणजी, ता. 18   ः जगातील सर्वांत मोठी प्रवासी नौका "व्हॉएजर ऑफ सीज' आज मुरगाव बंदरात दाखल झाली. त्यातून 3840 प्रवासी गोव्यात दाखल झाले. दुबईहून 15 मे रोजी ही नौका गोव्यात येण्यास निघाली होती. गोव्यातून ते जहाज मलेशिया ते सिंगापूरला कोचीमार्गे रवाना होणार आहे. या प्रवाशांचे स्वागत करताना मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष पी. मारा पांडियन म्हणाले, मार्च व एप्रिलमध्ये 14 प्रवासी नौका मुरगावमध्ये आल्या.
Friday, May 18, 2012 AT 09:59 PM (IST)
|