Last Update:
 
गोमन्तक विशेष

पणजी, ता. 27 ः देशात इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे एकदम छोटे राज्य आहे. या छोट्याशा राज्यात तब्बल चाळीस आमदार येथील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. देशातील एखाद्या राज्याच्या जिल्ह्याएवढे गोव्याचे क्षेत्रफळ आहे. इतर राज्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे आमदारांची आणि मंत्र्यांची मोठी संख्या समजून घेता येऊ शकते.

Saturday, January 28, 2012 AT 03:45 AM (IST)

माशेल, ता. 27 ः प्रियोळ मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर-दऱ्यांचा, कुळागारांनी व्यापलेला आणि विकासाच्या दृष्टीने मागासलेला असा मतदारसंघ आहे. सुरुवातीची 17 वर्षे आणि भाजपची राजवट सोडल्यास हा मतदारसंघ विरोधी पक्षाकडेच राहिला. त्यामुळे या मतदारसंघाचा तसा विकास झालेला.

Saturday, January 28, 2012 AT 01:30 AM (IST)

वाळपई, ता. 27 ः वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्‍वजित प्रतापसिंह राणे यांनी गेल्या पाच वर्षांत वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची बहुतेक कामे पूर्ण केली आहेत. वाळपई पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील रस्त्यांचे हॉटमिक्‍स डांबरीकरण झाले. वाळपईत डॉ. आमशेकर पुलापासून ते पेट्रोल पंपापर्यंत वाळपई, फोंडा व पणजी मुख्य रस्ता आदी रस्त्यांचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणही पूर्ण झाले.

Saturday, January 28, 2012 AT 01:15 AM (IST)

केपे, ता. 27 ः केपे मतदारसंघाचे आमदार या नात्याने लोकांच्या सेवेला वाहून घेताना लोकांच्या ज्या गरजा व मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले असून निवडणुकीवेळी जी जी आश्‍वासने आपण दिली होती ती आपण पूर्ण केल्याचे केपे मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले. या मतदारसंघातील अति दुर्गम अशा बार्शे, मोरपिर्ला, बेतूल, कावरे-पिर्ला, फातर्पा या पंचायत क्षेत्रात वीज व पाणी पुरवठ्याची सोय कोली.

Saturday, January 28, 2012 AT 01:00 AM (IST)

पणजी, ता. 25 - देशातील इतर ठिकाणांपेक्षा गोव्यात वैद्यकीय सुविधा चांगल्या असून, वैद्यकीय क्षेत्राचे नेतृत्व करण्याची ताकद गोमंतकीय डॉक्‍टरांत असल्याने सरकारपातळीवर त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत म्हापसा येथील प्रसिद्ध वृंदावन इस्पितळाचे डॉ. दिगंबर नाईक यांनी व्यक्त केले. गोव्यातील या वैद्यकीय सुविधांचा लाभ केवळ गोमंतकीयच नव्हे, तर परराज्यातील नागरिक आणि विशेष करून विदेशी पर्यटक घेताहेत.

Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)

पणजी, ता. 23 - इतर राज्यांपेक्षा गोवा हे आकाराने लहान राज्य असले, तरी येथील वातावरण उद्योगासाठी पोषक आहे. फक्त त्यासाठी आवश्‍यक साधनसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे, असे सांगताना गेल्या पाच वर्षांत त्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याची टीका प्रसिद्ध उद्योजक तथा गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मांगिरिश पै रायकर यांनी केली.

Tuesday, January 24, 2012 AT 01:10 AM (IST)

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यापूर्वीच नोंदविले निरीक्षण पणजी, ता. 12 (प्रतिनिधी) ः सांतिनेज खाडी नियमित स्वच्छ करण्यासाठी पावले न उचलून महापालिकेने घटनात्मक कर्तव्याचे पालन केलेले नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यापूर्वीच नोंदविले आहे. न्या. एस. बी. देशमुख आणि न्या. यू. डी. साळवी यांच्या खंडपीठाने 4 सप्टेंबर रोजीच्या अंतरीम आदेशात हे निरीक्षण नोंदविलेले आहे.

Monday, December 12, 2011 AT 09:36 PM (IST)

पणजी, ता. 9 ः सांतिनेज खाडी पुन्हा खळाळून वाहण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना सर्व संबंधित सरकारी खात्यांच्या मदतीने करण्याचा निर्णय गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  खाडीच्या बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्यासह तेथे फिरते स्वच्छतागृह तैनात करण्याची उपाययोजनाही बैठकीत सुचविण्यात आली. तत्पूर्वी खाडीच्या पाण्याचे नमुने घेऊन प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही ठरविण्यात आले.

Saturday, December 10, 2011 AT 05:01 PM (IST)

पणजी, ता. 7 ः सांतिनेजची खाडी पुन्हा खळाळून वाहिल्यास नागाळीच्या लोकांना शेती आणि भाजीचे मळे पुन्हा फुलविता येतील. सध्या खाडीचा प्रवाहच बंद केल्याने नागाळीलगत खाडीचा प्रवास सुकतो कारण भरतीचे पाणी वर येत नाही. या साऱ्याचा फटका सुमारे अनुसूचित जमातीच्या सुमारे दोन हजार जणांना बसतो.  नागाळीचे शेतकरी रामनाथ मंगेशकर यांनी आज "गोमन्तक'च्या कार्यालयात येऊन ही व्यथा मांडली.

Thursday, December 08, 2011 AT 04:45 AM (IST)

पणजी, ता. 4- सांतिनेज खाडीत पूर्वी होडीची वाहतूक होती. कधी बाहेरून जहाजे आली, तर त्यातील छोट्या होड्यांत खाडीत यायच्या असत. शिवाय नियमितपणे होड्यांची ये-जा असायची, अशी माहिती पोर्तुगीज कालीन कागदपत्रांत नमूद करण्यात आलेली आहे. ही कागदपत्रे सध्या पुराभिलेख आणि पुरातत्त्व संचालनालयाच्या ताब्यात आहेत.

Monday, December 05, 2011 AT 05:31 PM (IST)

पणजी, ता. 29 (प्रतिनिधी)ः सांतिनेज खाडीच्या तळाशी कॉंक्रीट घालण्याचा प्रस्ताव वास्कॉमनेच दिला होता. त्या प्रस्तावाला जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेच्या (जेएनएनयूआरएम) उपसमितीच विरोध झाला होता. त्याचमुळे खाडीचे अस्तित्व आजवर कायम राहिल्याचे उघड झाले आहे. "गोमन्तक'ने आज वास्कॉमच्या सादरीकरणाचे वृत्त दिल्यानंतर वास्कॉमच्या सादरीकरणादिवशी उपसमितीत काय घडले याची माहिती सूत्रांनी "गोमन्तक'ला दिली.

Tuesday, November 29, 2011 AT 09:39 PM (IST)

केंद्राकडून दखल, पण महापालिकेचे दुर्लक्ष "वास्कॉम'ने दिला होता अतिक्रमणे हटविण्याचा सल्ला पणजी, ता. 28 (प्रतिनिधी) ः सांतिनेज खाडी ही अतिक्रमणांनी वेढलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ यांची ही माहिती नसून महापालिकेला वर्षभरापूर्वी "वास्कॉम' या सल्लागार कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांत या अतिक्रमणांचा उल्लेख करण्यात आला आहे. असे असूनही ही अतिक्रमणे हटविण्यासाठी वर्षभरात काहीही प्रयत्न झाले नसल्याचे दिसून येते.

Monday, November 28, 2011 AT 10:52 PM (IST)

म्हादई अभयारण्य रद्द होणे अशक्‍यच ऍड. शिवाजी देसाई ः कंरझोळ-सत्तरीत शेतकऱ्यांची बैठक वाळपई, ता. 28 (प्रतिनिधी) ः सत्तरी तालुक्‍यातील म्हादई अभयारण्य हे आशिया खंडातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. एकदा अधिसूचित झालेले अभयारण्य रद्द करणे अशक्‍यच असते.

Monday, November 28, 2011 AT 09:09 PM (IST)

तीन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गोमेकॉ इस्पितळात यशस्वी पणजी, ता. 28 (प्रतिनिधी) ः दोन्ही मुलांना किडनीचा त्रास... त्यातील मोठ्या मुलाच्या तर दोन्ही किडनी निकामी... आभाळ कोसळले होते... पण "गोमेकॉ'चा आधार मिळाला. लवेश धुळापकर या माझ्या 18 वर्षांच्या मोठ्या मुलासाठी माझी एक किडनी दान केली आणि त्याला जीवदान मिळाले, असे डोळ्यात आसवे आणून तनुजा धुळापकर या मातेने भावना व्यक्त केल्या. दुसरी मंदा बोरकर..

Monday, November 28, 2011 AT 09:06 PM (IST)

रा ज्यातील खाणी बंद होणार, राज्यातील खनिज निर्यातीवर बंदी येणार अशी चर्चा गेले 15 दिवस जोर पकडू लागली आहे. खनिज निर्यातदारांच्या संघटनेनेही निर्यात बंदीनंतरच्या संभाव्य चित्र रंगविले आहे. आजवर राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या असलेल्या या व्यवसायाची चक्रे थांबणे कोणालाच परवडणार नाही. तसे झाल्यास राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्र ढवळून निघेल. कोणतेही सरकार तसे करू शकणार नाही.

Saturday, November 26, 2011 AT 03:00 AM (IST)

पणजी, ता. 23 ः दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा राजधानी पणजीत होणारा उद्‌घाटन सोहळा यंदा मडगावात आयोजित केल्याने आज पणजीच्या "इफ्फी'चा प्राणच हरविल्याचे दिसून आले. एरवी एक प्रकारच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा कला अकादमीचा परिसर आज कोणाच्या तरी प्रतीक्षेत असल्यासारखा सुन्न झाल्यागत दिसला.  इफ्फीचे उद्‌घाटन म्हणजे चित्रपट क्षेत्रातील नामवंतांची हजेरी.

Thursday, November 24, 2011 AT 04:15 AM (IST)

पणजी, ता. 23 : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन यंदा पहिल्यांदाच मडगावात झाले असले तरी यानिमित्त मांडवीकिनारी भरणारी खाद्यपदार्थांची जत्रा मात्र राजधानी पणजीतच भरली आहे.  विद्युत रोषणाईच्या झगमगाटात "भेल पुरी', "पानी पुरी', "पॉप कॉर्न', "गोबी मंचुरियन', "आइस्क्रीम', "सॅंडविच', "बॉम्बे पावभाजी' आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इफ्फीला एकप्रकारचा खमंगपणा आणतात.

Thursday, November 24, 2011 AT 04:00 AM (IST)

पणजी, ता. 23 (प्रतिनिधी) ः इफ्फीचे उद्‌घाटन आज मडगावात झाले. आता उद्यापासून (ता.24) पणजी मार्केटजवळील आयनॉक्‍स थिएटरमध्ये चित्रपटांची धूम सुरू होणार आहे. त्यासाठी आयनॉक्‍सचे प्रांगण छान सजविण्यात आले आहे.  आयनॉक्‍सच्या प्रांगणात पिवळ्या, निळ्या पट्ट्यांचे सुंदर डिझाईन तयार करण्यात आले असून त्यामुळे आधीच स्वच्छ, सुरेख असलेल्या आयनॉक्‍स पटांगणाला वेगळी रंगत आली आहे.

Thursday, November 24, 2011 AT 03:45 AM (IST)

1)आयनॉक्‍स स्क्रीन 2 सकाळी 10 ते 12.30 इंडियन पॅनोरमाचे उद्‌घाटन अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते चित्रपट ः उरूमी, अद्वैत संगीत -दुपारी 3.30 द कौन्सुल ऑफ बॉरडॉक्‍स (पोर्तुगीज चित्रपट संध्याकाळी 6. वाजता भूपेन हजारिका यांना श्रद्धांजली एक पल - दिग्दर्शन कल्पना लाझमी 10.30 वाजता ऍट नाइट दे डान्स चित्रपट - कॅनडा आयनॉक्‍स स्क्रीन 3 सकाळी 9 रिचर्ड लिकॉक यांना श्रद्धांजली लुऊसियाना स्टोरी 11.

Thursday, November 24, 2011 AT 03:30 AM (IST)

पणजी, ता. 23 - सांतिनेज खाडीवर पहिला अत्याचार झाला तो 1965 मध्ये. टोंक येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आणि त्यासाठी खाडीची रुंदी कमी करण्यात आली, अशी माहिती डॉ. नंदकुमार कामत यांनी दिली.   सांतिनेज खाडीसंदर्भात जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेच्या (जेएनएनयूआरएम) एका उपसमितीचे सदस्य असलेले डॉ. कामत यांचा उल्लेख यापूर्वीच्या सांतिनेज खाडीसंदर्भातील बातम्यांत आला होता.

Thursday, November 24, 2011 AT 03:00 AM (IST)

"रा वन' या चित्रपटाने पुन्हा आपण भारतीय सिनेसृष्टीचा बादशहा असल्याचे सिद्ध केल्यानंतर किंग खान लहान थोरांचा लाडका शाहरुख खान भारतातील सिनेमाच्या बादशहाला अर्थात भारताच्या 42व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात सलामी देणार आहे. 42 वर्षांचा झाला तरी इफ्फी गोव्यासाठी आठ वर्षांचाच. राजधानी पणजीतून आज उद्‌घाटनासाठी "इफ्फी' यंदा मडगावला चालला तरी उद्यापासून "इफ्फी'ची धूम नटलेल्या पणजीतील मांडवीकाठी रंगणार आहे.

Wednesday, November 23, 2011 AT 05:15 AM (IST)

पणजी, ता. 22 ः सांतिनेज खाडीत पूर्वी होड्या यायच्या. दमणहून येणाऱ्या मचव्यांवरील लोक या होड्यातून खाडीतूनच शहरात याचचे. पोर्तुगीजकाळात या खाडीत निर्माल्यही टाकण्यास बंदी होती. 1905 च्या प्रांत कादस्ट्राल (नकाशात) या खाडीची नोंद होती, अशी आठवण आज रामदास ना. प्रभू लवंदे यांनी आज "गोमन्तक'शी बोलताना सांगितली. सांतिनेज खाडीसंदर्भातील गेल्या दोन दिवसातील वृत्तासंदर्भातही ते भरभरून बोलले.  ते म्हणाले, सांतिनेजची खाडी ही नाला नव्हेच.

Wednesday, November 23, 2011 AT 05:00 AM (IST)

"सीआरझेड' चुकविण्याचा खटाटोप "एनआयओ'च्या शास्त्रज्ञांना संशय पणजी, ता. 20 ः सांतिनेजची खाडीला नाला म्हटलेले कोणाला आवडो अथवा न आवडो पण खाडीला नाला म्हटले आहे तेही सरकारी कागदपत्रांत. या खाडीला सीआरझेड लागू होऊ नये म्हणून ही खेळी खेळण्यात आल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. दोनापावलच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आंतोनिओ मस्कारेन्हास यांनी डॉ.

Monday, November 21, 2011 AT 06:09 PM (IST)

म्हापसा, ता. 20 : म्हापसा पालिकेचे प्रचंड दुर्लक्ष झाल्याने शहरातील बालोद्यानांची दुरवस्था झाली आहे. या बालोद्यानांना नवसंजीवनी मिळणार तरी कधी? असा प्रश्‍न म्हापशातील चिमुकल्यांना पडला आहे. बालोद्यान म्हटले, की चिमुकल्या मुलांचे खेळण्याबागडण्याचे तसेच विरंगुळ्याचे ठिकाण. राज्यातील बहुतेक शहरात बालोद्याने आहेत. पण यापैकी अनेक बालोद्यानाचे लहान मुलांविना ओसाड पडलेली पहावयास मिळते.

Monday, November 21, 2011 AT 05:56 PM (IST)

रो जची 'सकाळ' 'चिंटू'सोबत मस्त धमाल करत उजाडते... महाराष्ट्रातील आणि जगभर पसरलेल्या मराठी समुदायाची गेल्या वीस वर्षांची ही परंपरा ! होय, तब्बल वीस वर्षे. अख्खी फॅमिली 'चिंटू' वाचतेय, असं दृष्य घरा-घरांत दिसतं...फॅमिलीतल्या प्रत्येकाला 'चिंटू' आपला वाटतो...यांत 'चिंटू'चं सारं सारं यश आहे. नाही का? रोजच्या जगण्याला किंचित हलकं करणाऱया 'चिंटू'चा येत्या सोमवारी (ता. 21) आहे बर्थडे ! आपला 'चिंटू' एकविसाव्या वर्षांत प्रवेश करतोय...

Saturday, November 19, 2011 AT 06:09 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: