|
मुख्यपान
पणजी, ता. 20 ः राज्याच्या लोकायुक्तपदी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास किनगावकर यांची नियुक्ती करण्यासंदर्भात सरकारने विचार सुरू केला आहे. दरम्यान, गोवा सरकारने आपल्याशी अद्याप त्यासाठी संपर्क साधलेला नाही असे न्या. किनगावकर यांनी सांगितले.
म्हापसा, ता. 20 ः कळंगुट पंचायतीच्या अकरा प्रभागांसाठी उद्या (ता. 21) निवडणूक होत असून परवा मंगळवारी (ता. 22) पेडे येथील क्रीडा प्रकल्पामध्ये मतमोजणी होणार आहे.
पणजी, ता. 20 ः दुकानात वा पेट्रोलपंपावर किंवा अन्य ठिकाणी वस्तू खरेदी करताना मापात ग्राहकांची फसवणूक होते. कुणालाही सांगून खरे वाटणार नाही, पण वनजमाप खाते (लीगल मेट्रोलॉजी) दररोज अशा एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई करते.
पणजी, ता. 20 ः "खा, प्या आणि मजा करण्यासाठी गोव्यात या' अशा जाहीरातबाजीने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करता येणार नाही. पर्यटन क्षेत्राची गुणवत्ता वाढवितानाच त्या क्षेत्राच्या विस्तारालाही निर्बंध घालण्याची वेळ येणार आहे.
पणजी, ता. 20 ः पर्यटक व्हिसावर गोव्यात येऊन व्यवसाय करणारे आणि व्हिसाची मुदत संपूनही परत न जाणाऱ्या विदेशींची माहिती मिळविणे सरकारने सुरू केले आहे.
पणजी, ता. 20 ः गोवा क्रीडा प्राधिकरणात कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारपदी नियुक्त केलेल्या मिता आजगावकर यांच्या नियुक्तीाविषयी दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. मिताली ही माजी क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांची कन्या आहे.
पणजी, ता. 20 ः "गोवा कॅन' या बिगर सरकारी संस्थेने रस्त्याशेजारी टाकण्यात येणारा कचरा व मोठी रिळे यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर 48 तासांत रस्त्याशेजारची रिळे हटविण्यात आली.
मडगाव, ता. 20 ः कोलवा समुद्र किनाऱ्याची आज नागरिकांनीच पुढाकार घेऊन साफसफाई केली. कोलवातील नागरिक व पॅरिश युथ ऑफ कामुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोलवा समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली.
पणजी, ता. 20   ः राज्यात अमलीपदार्थ कुठून येतात याचा छडा लावण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. यात गुंतलेल्यांवर पोलिसांनी नजर ठेवली असून मुंबई व दिल्लीतून हे अमलीपदार्थ गोव्यात येत असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला आहे.
मडगाव, ता. 20 ः मडगाव शहर हे गोव्याची आर्थिक राजधानी असून कॉंग्रेस सरकारने नियम धाब्यावर बसवून शहराच्या बाह्य विकास आराखड्यात अनेक बेकायदेशीर प्रकार केले आहेत. भाजप मंडळातर्फे या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.
|