|
महाराष्ट्र-कर्नाटक
विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो वारकऱयांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी सहा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पुण्याकडे निघाली. पंढरपूरच्या प्रवासात आळंदी ते पुणे हा सुमारे २१ किलोमीटरचा टप्पा आहे. अधूनमधून येणाऱया पावसाच्या सरी, ढगाळ हवामान आणि मध्येच कडकडीत ऊन अशा समिश्र वातावरणात वारकऱयांनी पुण्याकडे मार्गक्रमण केले.
Wednesday, July 07, 2010 AT 12:00 AM (IST)
गडचिरोली -  नक्षल नेता आझाद यांच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज (ता.सात व आठ) ला पुकारलेल्या बंदमुळे नक्षलग्रस्त भागात अनेक ठिकाणी बाजारपेठ व वाहतूक बंद होती. आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील गोलागर्जी गावाजवळ माओवाद्यांनी रस्त्यात झाडे तोडून टाकल्याने या मार्गाची वाहतूक आज सकाळ पासूनच बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून एस.टी. महामंडळाने दुर्गम भागातील अनेक मार्गाच्या बस फेऱ्या बंद ठेवल्या आहेत.
Wednesday, July 07, 2010 AT 02:54 PM (IST)
कोल्हापूर - सांगलीहून श्री क्षेत्र जोतिबाकडे निघालेली राज्य परिवहनमहामंडळाची बस दरीत कोसळून दोन भाविक मृत पावल्याची आणि १५ जण जखमीझाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. याघटनेनंतर तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.   जखमींनाकोल्हापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारणअद्याप स्पष्ट झालेले नाही. सांगलीहून आलेली एसटी बस कोल्हापूरमार्गेजोतिबाच्या डोंगराकडे निघाली होती.
Thursday, June 10, 2010 AT 02:15 PM (IST)
मालवण, ता. १ : किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णत: बंद करण्यात आली आहे. दरम्यान, पर्यटन हंगामात येथील सिंधुदुर्ग किल्ल्यास ५५ हजार २९८ पर्यटकांनी भेट दिली. येथील सिंधुदुर्ग किल्ल्यास भेट देण्यास येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून केली जाते.
Thursday, June 03, 2010 AT 05:52 PM (IST)
सावंतवाडी, ता. १ : कारिवडे परिसरातील तरुणीवर अत्याचाराचे प्रकरण आज येथील पोलिस ठाण्यात आले. संबंधिताने अत्याचारग्रस्त तरुणीची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे तूर्तास पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही मात्र तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी आज दिली. कारिवडे परिसरातील तरुणीच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
Thursday, June 03, 2010 AT 05:52 PM (IST)
|