Last Update:
 
संपादकीय

हफीज सईदच्या सुटकेने पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड झाला आहे. त्यामुळे भारताने यापुढे पाकिस्तानशी वाटाघाटी केल्यास, त्याचा किती उपयोग होणार, याविषयी शंका आहे. पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संघटनेच्या कारवाया उघडकीस आणण्यात गेली काही वर्षे भारताला यश येते आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत भारताच्या संदर्भात कोणतीही हालचाल करताना आयएसआय थेट सहभाग घेताना दिसत नाही.

Thursday, June 03, 2010 AT 05:10 PM (IST)

ग. प्र. प्रधान यांच्या निधनाने निरलस व ध्येयवादी वृत्तीने सार्वजनिक जीवनात काम केलेल्या पिढीचा एक दुवाच निखळला आहे. समाजातील दलित, पीडित आणि उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठीच राजकारण करायचे, यावर दृढ श्रद्धा असलेला माणूस आपल्यातून गेला आहे. ऐन तारुण्यात त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी झपाटून काम केलेच परंतु वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतरही सतत देत राहण्याची त्यांची असोशी कमी झाली नव्हती.

Thursday, June 03, 2010 AT 05:11 PM (IST)

देशाच्या बहुतेक भागात हजेरी लावून मॉन्सूनच्या सुखद आगमनाची वार्ता देणाऱ्या वादळी पावसाबरोबरच जानेवारी ते मार्च २०१० या अखेरच्या तिमाहीत उद्योग आणि सेवा क्षेत्रासह अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी (८.६ टक्के) या दोन चांगल्या बातम्यांमुळे धोरणकर्ते काहीसे सुखावले असतील. केंद्रीय संख्याशास्त्रीय संघटनेने (सीएसओ) २००९-१० या वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. तो ७.४ टक्के इतका नोंदविला गेला आहे.

Thursday, June 03, 2010 AT 04:21 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: